सांगली : तासगावजवळ मोटार व दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये महिलेसह तिघांचा मृत्यू झाला, तर चौघे जखमी झाले. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ आटोपून सांगलीत परतत असताना शिक्षकांची मोटार दुचाकीला धडकल्याने मंगळवारी दुपारी हा अपघात घडला.

तासगाव – भिलवडी मार्गावरील तासगाव शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर चेतना पेट्रोल नजीक मोटार आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. या अपघातात काकडवाडी येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले दुचाकीवरील वृद्ध दाम्पत्य व त्यांचा पाच वर्षांचा नातू असे तिघेजण ठार झाले. तर, मोटारीतील चौघेजण गंभीर जखमी झाले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मोटारीमधील सांगली येथील एका शिक्षण संस्थेतील चौघे शिक्षक कडेपूर येथील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यास गेले होते. स्वाती अमित कोळी (रा. सांगलीवाडी) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वाती कोळी यांच्यासह अन्य तीन शिक्षक कडेपूर येथे गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर कडेपूर येथून पाचवा मैल- तासगाव मार्गे पुढे सांगलीला जाण्यासाठी निघाले होते.

दुपारी दोनच्या सुमारास तासगावच्या जवळ आल्यानंतर समोरून येणारी दुचाकी व त्यांच्या मोटारीची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, धडकेनंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूला खाली एका द्राक्ष बागेत जाऊन पडली.

अपघातात दुचाकीवरील दुचाकीचालक शिवाजी बापू सुतार (वय-५७), आशाताई शिवाजी सुतार (वय – ५५), वैष्णव ईश्वर सुतार (वय – ५, रा. बुर्ली ता. पलूस) हे तिघेही ठार झाले. तर, मोटारीमधील पूजा राघवेंद्र कुलकर्णी, सूरज पवार, स्वाती अमित कोळी (रा. सांगलीवाडी) व अन्य एकजण गंभीर जखमी झाले. या अपघातातील जखमींना तासगाव व सांगली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मोटारीमधील सांगली येथील एका शिक्षण संस्थेतील चौघे शिक्षक कडेपूर येथील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यास गेले होते. स्वाती अमित कोळी (रा. सांगलीवाडी) यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वाती कोळी यांच्यासह अन्य तीन शिक्षक कडेपूर येथे गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर कडेपूर येथून पाचवा मैल- तासगाव मार्गे पुढे सांगलीला जाण्यासाठी निघाले होते.