कारवाई योग्यच असून या भुमिकेला माझे समर्थन

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाई: अफझल खान कबरी शेजारील काढलेलं अतिक्रमण हे योग्यच आहे. राज्य सरकारनं कायद्याचा आधार घेवून केलेली कारवाई आहे. ही योग्यच असून या भुमिकेला माझे समर्थन आहे. या कारवाईला राजकीय वळण देवू नका तसेच प्रतापगडावरील अफझल खान कबर ही लोकांसाठी खुली करा असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात व्यक्त केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची  भेट घेतली. यानंतर उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला.   

हेही वाचा >>> अफजल खानाच्या कबरीवरील बांधकाम रात्रीच जमीनदोस्त

अतिक्रमणावर राज्य शासनाने जी कारवाई करायची होती ती योग्य पद्धतीने केली. ही कारवाई मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे, असा समज कोणी करून घेऊ नये. कायद्याच्या आधारावर राज्य शासनाने केलेली कारवाई योग्यच आहे.अतिक्रमण काढण्याच्या कारवाई ला राजकीय स्वरूप देऊ नका, असे त्यांनी नमुद केले. ज्यांनी कारवाई करायला हवी होती त्यांनी का केली नाही. हा त्यांचा प्रश्न आहे. यामुळे काही परिणाम होतील, असं त्यांना वाटलं असेल. पण आता राज्य सरकारने कायद्यानुसार कारवाई केली आहे आणि ती योग्यच आहे. या भूमिकेला समर्थन आहे. या अतिक्रमणविरोधी कारवाईला राजकीय वळण देवू नका. तसंच प्रतापगडावरील अफजल खान कबर ही लोकांसाठी खुली करा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच मान सन्मान दिला आहे. मग हल्ला करायला आलेला अफजल खान का असेना. अफजल खानाचा वध झाल्यानंतर महाराजांनी त्याची कबर बांधण्याची अनुमती दिली. हा एवढा मोठा विचार आपण कोणीच केला नाही. कबर बांधली. पण अफजल खानाची कबर म्हणजे शौर्याचं प्रतीक नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला मान होता. हा महाराजांचा मोठेपणा होता. नाहीतर काहीही होऊ शकलं असतं, असं उदयनराजे म्हणाले. अफजल खानाच्या कबरीजवळ नागरिकांना जाऊ द्या. त्यांना इतिहास कळू द्या, असंही उदयनराजे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार इंग्लंडच्या सरकारकडे संग्रहालयात आहे. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारी आणि भारताचा तसाच महाराष्ट्राचं स्वाभिमान आहे यामुळं जनभावना लक्षात घेवुन ही तलवार मोठ्या मनानं ब्रिटिश सरकारनं भारताकडं सोपवली पाहिजे, असं मत खासदार उदयनराजे यांनी  व्यक्त केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The action is right open grave afzal khan the public udayanraje bhosale ysh