राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. कालचा दिवस मराठा आंदोलक मनोज जरांगेंमुळे गाजला. त्यांच्या आंदोलनाची आणि त्यांच्या वक्तव्याची चौकशी करण्याकरता एसआयटी गठीत करण्याचे आदेश देण्यात आले. तर, आज उपमुख्यमंत्री अजित पवारांना टार्गेट केलं जातंय. आमदार रोहित पवार यांनीही अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ते विधानभवनात आज पत्रकारांशी बोलत होते.

“गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंना गुंड भेटतात. देवेंद्र फडणवीसांना गुंड भेटतात. अजितदादांना गुंड भेटतात. मग लोकसभेला गुंडाचा वापर करणार आहात का? असा थेट सवाल रोहित पवारांनी विचारला.

हेही वाचा >> “..आणि तेव्हापासून पवार कुटुंबीयात दुरावा निर्माण झाला”, बारामतीमध्ये निनावी पत्र व्हायरल; राजेंद्र पवार म्हणाले…

“मला वाईट याचं वाटतं की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे पूर्वीपासूनच गुंडांना भेटत असावेत. आमच्या काकांनीसुद्धा मला अडचणीत आणण्यासाठी माझ्या मतदारसंघातील गुंडाला जवळ केलं आहे. ही तुमची वृत्ती आहे. भाजपाच्या जवळ गेल्यानंतर दादांना माझा असा प्रश्न आहे की तुम्ही गुंडांचा वापर करणार? असाही प्रश्न रोहित पवारांनी विचारला.

एसआयटीचं खरं टार्गेट कोण?

एसआयटीचा मुद्दा कोणी मांडला? भाजपाच्या आमदाराने मांडला. एसआयटी कोणी गठीत केली? तर एसआयटी भाजपाच्या अध्यक्षांनी गठीत केली. अशा परिस्थिती टार्गेट कोणाला प्रयत्न केला जातोय? त्यामुळे भाजपाचे टार्गेट एकनाथ शिंदे नाही ना, असा प्रश्न उपस्थित होतोय, असंही रोहित पवार म्हणाले.