राज्यात दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी अधिक काळजी घेणे गरजेचे ठरले आहे. गेल्या काही दिवसांत दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधितांपेक्षा अधिक होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात आज ५७५३ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ४०६० करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण १६,५१,०६४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, राज्यात एकूण ८१,५१२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२.७५ टक्के झाले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today the number of patients increased compared to the number of patients recovering in the state aau