औरंगाबाद शहर सकाळी व दुपारच्या सुमारास झालेल्या हत्येच्या घटनांनी हादरले. दोन दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये एकाने मैत्रिणीची हत्या करून स्वतः आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असताना शनिवारी (२१ मे) भरदुपारी एकतर्फी प्रेमातून एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचा महाविद्यालयापासून जवळच खून करण्यात आला. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झालेले आहेत. मृत १९ वर्षीय विद्यार्थिनी व तिचा मारेकरी हे दोघेही एकाच समुदायातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसऱ्या घटनेत जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी साबिर शहा कासीम शहा (वय ३६) व फरहान खान निजाम खान (वय १९, दोघेही रा. कटकटगेट पाण्याच्या टाकीजवळ) या दोघांमध्ये किरकोळ शिवीगाळ करण्याच्या कारणावरून वाद झाला. फरहानने जवळील एका धारदार वस्तूने साबीरशहा यांच्या पोटात मारुन गंभीर जखमी केले. साबीरशहा याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी पहाटे त्याला मृत घोषित केले.

एकतर्फी प्रेमातून घडलेल्या घटनेप्रकरणात पोलीस घटनास्थळी दाखल

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिन्सीचे पोलीस निरीक्षक व्ही. एम. केंद्रे यांनी दिली. घटनास्थळी केंद्रे यांच्या एपीआय मगरे आदींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. तपासासाठी गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक तांगडे सुनील जाधव यांना आरोपीचा शोध घेण्यासाठी नारेगाव येथे रवाना करून आरोपीस ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. तसेच पंचनामा उपनिरीक्षक हारुण शेख यांच्या पथकाने केला.

हेही वाचा : औरंगाबादेत मध्यरात्री घडल्या खूनाच्या दोन घटना, एका तरुणासह महिलेच्या हत्येनं परिसरात खळबळ

दरम्यान, आरोपीची मोठी टोळी असून त्यात सर्व अल्पवयीन व १८ वर्षापर्यंतची मुले असल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील बरेच जण रात्री फक्त बटन विकण्याचा व्यवसाय करतात. पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.

औरंगाबादमधील तिसरी खुनाची घटना

औरंगाबाद शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात आता दाखल गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली. जखमी शेख नासिर शेख बशीर (वय ३८) याचा शनिवारी घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या गुन्ह्यातील आरोपी फय्याज राजू पठाण याला १५ मे रोजीच अटक केली होती. शुक्रवारी त्याची पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे, असे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two murder in aurangabad due to one side love and other dispute pbs
First published on: 21-05-2022 at 18:07 IST