कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत आणि सोलापुरातील गावांवर दावा सांगितला होता. बोम्मईंच्या दाव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले होतं. त्यातच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवारी ( १४ डिसेंबर ) दिल्लीत बैठक पार पडली. गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सीमाभागातील गाांवर दावे करणारी विधाने करू नयेत, असा सल्ला गृहमंत्री शाह यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिला. यावरून आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आतेबहिण कीर्ती पाठक यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. तसेच, बोम्मई यांचाही समाचार घेतला आहे.

हेही वाचा : “बहुमताचा आकडा १८२पर्यंत जाणार, नव्या वर्षात…”, उदय सामंत यांचा मोठा दावा; म्हणाले, “खरा धमाका…”!

“भाजपाला प्राण्यांचे प्रेम खूप आहे, हे गेल्या काही दिवसांपासून निरीक्षणास आलं आहे. भाजपाने एक श्वानपथक नेमलं असून, त्यातील एक-एक श्वान थोड्या-थोड्या दिवसांनी येऊन भूंकत असतो. त्यांचा रिमोट दिल्लीत आहे. सीमाप्रश्नी गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचा एक देखावा केला आहे. मध्यस्ती करत त्यातून उपाय सांगितला की, कोणीच कोणाच्या गावांवर दावा सांगयाचा नाही. पण, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून शिवसेनेचा जन्म झाला. बेळगाव, कारवार आणि निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे शिवसेनेचं स्वप्न आहे. त्याच्यासाठी अनेक हुतात्मे झाले असून, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी त्याचा विसर पडू देता कामा नये,” असा सल्ला कीर्ती पाठक यांनी दिला.

“जत, सोलापूर आणि अक्कलकोट आम्हाला पाहिजे, असं बोम्मई म्हणत आहेत. ही स्क्रिप्ट त्यांना दिल्लीतून लिहून आली आहे. तुम्ही या गावांवर दावा सांगा, मग आम्ही मध्यस्ती केल्यासारखं दाखवू. त्यानंतर महाराष्ट्र बेळगाववर आणि कर्नाटक आपल्या राज्यातील गावांवर दावा सांगणार नाही. मग सीमावाद आम्ही सोडवला म्हणत आम्हाला वेडे बनवणार. पण, बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक वेडा बनणारा नाही आहे,” असे कीर्ती पाठक यांनी सांगितलं.

हेही वाचा : ‘आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात’ झाला म्हणणाऱ्या संजय राऊतांवर आशिष शेलार संतापले; म्हणाले “आता यांची मस्ती थेट…”

“बोम्मईंनी ट्वीटर अकाउंट माझं नाही, हे सांगितलं. पण, ट्वीटर अकाउंटवर अवलंबून राहण्याचं कारण काय आहे? तुम्ही महाराष्ट्राच्या ट्रक आणि बसेल फोडल्या आहेत. महाराष्ट्राच्या कोणत्याही मंत्र्यांनी बेळगावात यायचं नाही, हे तुम्ही म्हणाला. याचा ट्वीटर अकाउंटशी काय संबंध आहे. विषय बदलून जनतेला वेड बनवायचं. मात्र, जनता एवढी दूधखुळी नाही आहे. एक विषय विसरल्यानंतर दुसरा विषय काहीतरी काढायचा. भाजपाकडे श्वानपथक आहे. कोणतरी कोकणात भुंकतो, मुंबईत कोणतरी भुंकतो हे चालूच असते,” असा खोचक टोला कीर्ती पाठक यांनी लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray sister kirti pathak attacks bjp and karnatak cm basavaraj bommai over maharashtra karnatak dispute ssa