देशभरात ३१ डिसेंबर रोजी वर्षातील शेवटचा दिवस उत्सहात साजरा करण्यात आला. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्युत रोषनाईने विविध शहरं सजली होती. कोणी दारू-मटणाच्या पार्ट्या करतं तर कोणी देवदर्शनानं नवीन वर्षाचं स्वागत करत होतं. पण जळगावमध्ये मात्र अनोख्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी जळगावमध्ये गोमूत्र प्राशन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. जळगावमधील रतनलाल बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रात ही पार्टी रंगली. यामध्ये अनेक महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला होता. प्रत्येकाने गोमूत्र पिऊन नवीन वर्षाचं स्वागत केलं. या पार्टीचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.

या गोमूत्र पार्टीत सहभागी झालेल्या एका महिलेनं सांगितलं की, ३१ डिसेंबर हा दिवस काहीजण दारू पिऊन साजरा करतात, तर आम्ही गोमूत्र पिऊन साजरा करत आहोत. इथे गोशाळेत आम्ही ताजं गोमूत्र पितो. दारू पिणारे कुटुंबाला सोडून एकटेच दारू प्यायला जातात. पण आम्ही संपूर्ण कुटुंबाला घेऊन गोमूत्र प्राशन करून ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करतो.”

“दारू सोडण्याला गोमूत्र हा एकच पर्याय आहे. जो गोमूत्र पितो, त्याची आपोआप दारू सुटते. दारू पिऊन लोकं रस्त्यावर लोळतात. दारू पिऊन लोकांचा मृत्यू झाला, अशा बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचतो. पण गोमूत्र पिऊन व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी बातमी कुठेही वाचली नसेल. त्यामुळे दारू सोडा आणि गोमूत्र प्या…” अशी प्रतिक्रिया गोसेवा अनुसंधान केंद्राचे व्यवस्थापक अभय सिंह यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unique party of cow devotees in jalgaon welcome new year by drinking cow urine video goes viral rmm