अहिल्यानगरः पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील वाळू तस्करांविरुद्ध विशेष मोहिम राबवली. गेल्या दोन दिवसात एकुण ११ ठिकाणी छापे टाकून २८ जणांविरुद्ध अकरा गुन्हे दाखल करत सुमारे १ कोटी २८ लाख रुपये किंमतीचे वाळू साठे व वाहने जप्त केली. जिल्ह्याच्या उत्तर भागातील विशेषतः गोदावरी नदीपात्रात ही मोहीम राबवली गेली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील श्रीरामपूर, शेवगाव, नेवासा, कोपरगाव, राहता व पारनेर  या तालुक्यांमध्ये पोलिसांनी ही मोहीम राबवली. त्यासाठी पोलिसांची विविध पथके तयार करण्यात आली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार अतुल लोटके, गणेश लोंढे, संदीप दरंदले, बीरप्पा करमल, सोमनाथ झांबरे, रोहित येमूल, भाऊसाहेब कांबळे, अमोल कोतकर, विशाल तनपुरे, रमीजराजा आत्तार, अशोक लीपाणे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने श्रीरामपूर, राहता, कोपरगाव, मिरजगाव, पारनेर, नेवासा येथे सात ठिकाणी छापे टाकून १३ आरोपींविरुद्ध ७ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून वाळू साठे व वाहने असा ८८ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याशिवाय श्रीरामपूर व शेवगाव तालुक्यातील वाळू तस्करांवर कारवाई करत १५ आरोपींविरुद्ध ४ गुन्हे दाखल केले. त्यामध्ये ४० लाख २० हजार रुपये किमतीचे वाळू साठे व वाहने जप्त केली. या कारवाईमध्ये पोलिस अंमलदार गणेश लोंढे, गणेश भिंगारदे, किशोर शिरसाट, बाळासाहेब खेडकर यांनी सहभाग घेतला.

या मोहिमेत आणि नदीपात्रात अनेक ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा करतानाच तस्करांना पकडण्यात आले एकट्या श्रीरामपूर तालुक्यातच ४० लाखाचे वाळू साठे व वाहने जप्त करण्यात आली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicles and sand deposits worth rs 1 25 crore seized by police in ahilyanagar 28 people arrested amy