आपल्या देशात आणि राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशात इतर प्रश्न उगाच समोर आणले जात आहेत. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच महाविकास आघाडी मजबूत आहे, महाविकास आघाडीला कुठलाही धोका नाही असं शरद पवारांनी म्हटलं आहे. सध्याचा जो ट्रेंड आहे देशात तो भाजपाविरोधी आहे. देशाचा नकाशा समोर ठेवला तर आपण केरळपासून सुरुवात करु केरळमध्ये भाजपा आहे का? नाही. तामिळनाडू, तेलंगण, आंध्र, कर्नाटक या राज्यांमध्येही त्यांची सत्ता नाही. गोव्यात आमदार फोडून राज्य आणलं. महाराष्ट्रातही तेच केलं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. देशातल्या प्रमुख राज्यांमध्ये भाजपाचं सरकार नाही. २०२४ ला लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतलेली दिसते. हा ट्रेंड राहिला कायम राहिला तर बदल घडेल हे सांगायला ज्योतिषांची गरज नाही.
लव्ह जिहाद विषयी काय म्हणाले आहेत शरद पवार?
शरद पवार यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला की लव्ह जिहादची प्रकरणं देशात वाढत आहेत अशी चर्चा आहे. त्याबद्दल काय सांगाल? या प्रश्नावर शरद पवार
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.