सोलापूर : बैलगाडा शर्यतीत वेगाने धावणारा बैलगाडा प्रेक्षकांच्या गर्दीत घुसल्याने घडलेल्या दुर्घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. सांगोला तालुक्यातील महूदजवळ ही दुर्घटना घडली.सुरेश हरिअप्पा सरगर (वय ४०, रा. महूद) असे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. महूद-महिम परिसरात अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या सहकार्याने बैलगाडा शर्यत भरविण्यात आली होती. या शर्यतीत सोलापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील सुमारे २५० बैलगाडे उतरले होते. ठरल्याप्रमाणे बैलगाडा शर्यतीला उत्साहात सुरुवात झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हजारो प्रेक्षक शर्यत पाहण्यासाठी हजर होते. त्याच वेळी दोन बैलगाडे वेगाने धावत असताना अचानकपणे त्यातील एक बैलगाडा नियंत्रण सुटल्याने प्रेक्षकांच्या गर्दीत घुसला. तेव्हा गोंधळ उडाला. बैलगाड्याची सुरेश सरगर यास जोरदार धडक बसली. त्याच्या छातीला जोरात मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सांगोला पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth dies after bullock cart rams into spectators during race amy