X
X

‘या’ कारणामुळे अक्षय कुमार व रोहित शेट्टीत झाली हाणामारी, पाहा व्हिडीओ

READ IN APP

क्रू मेंबर्सना करावी लागली मध्यस्थी

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अक्षय कुमार मुख्य भूमिका साकारत आहे. या दोघांमध्ये सुरुवातीपासूनच मैत्रीचं नातं आहे. पण अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि या व्हिडीओत तो रोहित शेट्टीसोबत हाणामारी करताना दिसत आहे.

या व्हिडीओच्या सुरुवातीला अभिनेत्री कतरिना कैफ मोबाइलवर एक बातमी दाखवताना दिसते. अक्षय कुमार व रोहित शेट्टी यांच्यात ‘सूर्यवंशी’च्या चित्रीकरणादरम्यान मतभेद झाल्याची ही बातमी आहे. त्यानंतर ती म्हणते की यांच्यातील वाद लाईव्ह पाहुयात.. रोहित व अक्षय एकमेकांना खोटी हाणामारी करताना दिसतात. सेटवरील काहीजण या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि व्हिडीओअखेर अक्षय व रोहित जमिनीवर लोळत ‘हमे लडना पडेगा’ असं म्हणतात.

या दोघांमधील खोट्या हाणामारीचं कारण म्हणजे, एका वेबसाइटने दिलेली बातमी. ‘सूर्यवंशी’च्या सेटवर अक्षय व रोहित यांच्या भांडण झाल्याच्या वृत्तावर अक्षयने त्याच्याच अंदाजात उत्तर दिलं आहे. या व्हिडीओवर निर्माता, दिग्दर्शक करण जोहरनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘या भांडणात मी सुद्धा मध्यस्थी करु शकत नाही’, असं त्याने ट्विटरवर म्हटलंय. एकंदरीत रोहित व अक्षयने वेबसाइटच्या वृत्ताला अत्यंत मजेशीर पद्धतीने उत्तर देत नेटकऱ्यांचं मनोरंजन केलं आहे.

‘सूर्यवंशी’ हा अक्षय कुमारचा रोहित शेट्टीसोबतचा पहिलाच चित्रपट आहे. ‘सिंघम’, ‘सिंघम रिटर्न’, ‘सिम्बा’नंतर याच मालिकेतला हा चौथा चित्रपट आहे. पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

21
X