X

गर्भवती असताना करणार होते आत्महत्या पण…; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

जाणून घ्या काय आहे या मागचं कारण...

‘नव्या… नयी धडकन नये सवाल’ या मालिकेतून अभिनेत्री सौम्या सेठ प्रकाश झोतात आली होती. त्यानंतर तिने ‘अशोका’ सारख्या ऐतिहासिक मालिकेत देखील काम केले. आता याच सौम्याने एका मुलाखतीत गर्भवती असताना आलेल्या आत्महत्येच्या विचाराबद्दल सांगितले आहे.

सौम्या आता अमेरिकेत राहत असून जुन २०१९ मध्ये तिचा घटस्फोट झाला आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, “२०१७मध्ये माझं लग्न झालं असून मी गर्भवती होते. त्यावेळी माझे आई-वडील वर्जीनियाला येई पर्यंत मी आत्महत्या करण्याचे वेगवेगळे प्रकार शोधत होते. त्यांनी मला मदत केली आणि मला या भयानक परिस्थितीतून बाहेर काढले,” असे सौम्या म्हणाली.

सौम्या पुढे म्हणाली,”मला एक वेळ आठवते जेव्हा मी आरशासमोर उभी होते आणि मी स्वत:ला ओळखू शकत नव्हते. मी आश्चर्यचकीत होते. गर्भवती असूनही, अनेक दिवस मी जेवन करत नव्हते. त्यानंतर काही दिवस मी स्वत:ला आरशात पाहण्याची हिंमत करू शकत नव्हते. मला फक्त माझे आयुष्य संपवायचे होते.”

सौम्याने पुढे तिच्या वेदनांबद्दल सांगितले. “मी गरोदर होती आणि जेव्हा मला जाणवले की मी मेली तर माझ्या बाळाला कळणार नाही की माझे त्याच्यावर किती प्रेम आहे. माझ्या बाळाला आयुष्यभर आईशिवाय जगावे लागेल. मी स्वत: ला मारू शकत होते, परंतू कधी माझ्या बाळाला इजा करण्याचा विचार मी केला नाही. होय, म्हणूनच माझा मुलगा आयडेनने माझा जीव वाचवला.”

एवढे वर्ष छोट्या पडद्यापासून लांब असल्यानंतर आता हे काम करते सौम्या…

कॅमेऱ्यावर आज देखील तिचे प्रेम आहे. पुन्हा एकदा स्क्रिनवर येण्यावर तिला काही अडचन नाही. तर सध्या, सौम्या वर्जीनियामध्ये प्रॉपर्टी डीलरच काम करते.

दरम्यान, २०१५ मध्ये सौम्याने अरुण कुमार सोबत अमेरिकेत एका रिसॉर्टमध्ये लग्न केले होते. लग्नाच्या ४ वर्षांनंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला.

21
READ IN APP
X