संगीतकार, गायक आणि गीतकार अशा भूमिका बजावल्यानंतर आता ऑस्कर पारितोषिक विजेता ए. आर. रेहमान निर्माता आणि चित्रपट कथा लेखकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने अलीकडेच स्थापन केलेली ‘वायएम मूव्हीज’ निर्मिती संस्था आणि ‘इरॉस इंटरनॅशनल’ एकत्रितपणे एका चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. रेहमान प्रथमच चित्रपटाची निर्मिती करीत असून, चित्रपटाची मूळ कथादेखील त्यांनीच लिहिली आहे. प्रेम, कला आणि आत्मशोधावर आधारित असा हा तरूणांचा भावनाप्रधान चित्रपट असणार आहे. रेहमान म्हणाले, माझे इरॉसबरोबरचे १६ वर्षांपासूनचे संबंध असून, या चित्रपटाच्या एकत्रित निर्मितीद्वारे आम्ही एक पाऊल पुढे गेलो आहोत. आपल्या निर्मिती संस्थेबाबत बोलतांना रेहमान म्हणाले,  आनंद, कलात्मकता आणि चित्रपटाच्या गरजा भागवणारे चित्रपट बनवण्याच्या तीव्र इच्छेतून ‘वायएम मूव्हीज’ची निर्मिती करण्यात आली आहे. रेहमानबरोबरच्या या खास भागीदारीची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या चित्रपटाद्वारे संगीत आणि चित्रपट एका उत्कृष्ट पातळीवर सादर करून प्रेक्षकांना मनोरंजनाचा अविस्मरणीय अनुभव देण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे ‘इरॉस इंटरनॅशनल मीडिया’चे व्यवस्थापकीय संचालक सुनिल लुल्ला म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A r rahman turns producer story writer