छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रत्येक कलाकाराचा एक चाहता वर्ग आहे. दरम्यान, मालिकेत विशाखाची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूनम चांदोरकरला एक मोठी संधी मिळाली आहे. पूनम दाक्षिणात्य सूपरस्टार विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करत तिने विजय सेतुपतीसोबत काम करणार असल्याचे म्हटले आहे. पूनमने विजय सेतुपतीसोबत हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ती म्हणाली, “तुमचं मन तुम्हाला सांगतं की हे अशक्य आहे, पण ते शक्य होतं. तमिळ सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत काम करणं हा माझ्यासाठी एक सुखद धक्का आहे. हे सगळं तुमच्या आशीर्वाद आणि प्रेमामुळे शक्य झालं.” पूनमची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

आणखी वाचा : अभिनेता सिद्धार्थ पुन्हा नव्या वादात; सायना नेहवालला मोदींच्या ट्वीटवरून नको त्या भाषेत रिप्लाय केल्याचा होतोय आरोप

आणखी वाचा : ‘काम मिळत नव्हतं, बॉयफ्रेंड बाथरूममध्ये बंद करायचा…’, अभिनेत्री कोएनाने केला धक्कादायक खुलासा

पूनम नक्की कोणत्या चित्रपटात काम करणार आहे. तिची भूमिका कोणती असेल असे अनेक प्रश्न तिच्या समोर आले नाही. पण सोशल मीडियावर पूनमची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. आता तिच्या चाहत्यांना तिला आणि विजय सेतुपतीला कधी एकत्र पाहायला मिळणार अशी आतुर्ता लागली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aai kuthe kay karte fame actress poonam chandorkar going to work with south star vijat sethupathi dcp