Premium

“कशाला पाहिजे टिकली फिकली…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत

“टिकली लावून आपण बावळट वाटतो.”

Radhika Deshpande
आपले नवरे कुठे लावतात आपल्या नावाचं काही मग आपणच का लावायची?

शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आहेत. महिला पत्रकाराशी बोलताना केलेल्या एका विधानामुळे संभाजी भिडे हे चर्चेत आले आहेत. त्यांच्या या विधानावर सर्व स्तरावरुन प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसत आहे. नुकतंच मराठीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने प्रकरणावर उघडपणे भाष्य केले आहे. तिने याबद्दल जाहीरपणे तिचे मत मांडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी अभिनेत्री राधिका देशपांडे ही कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत तिने देविका हे पात्र साकारलं होतं. या मालिकेत अरुंधतीची सर्वात जवळच्या आणि लाडक्या मैत्रिणीचे हे पात्र होते. नुकतंच तिने तिचे टिकली याबद्दलचे भाष्य केले आहे.
आणखी वाचा : पत्रास कारण की… टिकली! भिडे आजोबांना नातीने लिहिलेलं खुलं पत्र

राधिका देशपांडेंची पोस्ट चर्चेत

“बिंदू मात्र असलेली ही इवलीशी टिकली सध्या हेडलाईन्सच्या मध्यभागी आहे. खरंतर ही ‘फोरहेड‘ म्हणजे कपाळाच्या मध्यभागी बघायला मिळते. अर्थातच स्त्रियांच्या! पण सध्या ती तिथून दिसेनाशी झाली आहे. कधीतरी दिसते, कधी पुसट, अधून मधून दिसते पण काहींनी ती दिसेनाशी व्हावी म्हणजे इतिहास जमा व्हावी असं चित्र रंगवणं सुरू केलं आहे.

सध्या ही लाल, हिरव्या, भगव्या, गुलाबी, निळ्या अश्या विविध रंगात उपलब्ध आहे. टिकलीचा आकार वेळ, स्थळ, काळ आणि वयोपरत्वे बदलत असतो. बाजारात किमान १३० करोड पेक्षा जास्त त्यांची संख्या असावी. नाही का? काहींना त्यामुळे प्रश्न पडला आहे की हिला आपण संपुष्टात कसं आणायचं?

इतिहास जमा अनेक वस्त्र, शस्त्र, अस्त्र, आभूषणं झाली. तसेच टिकल्या संपवूया म्हणून काही तक धरून आहेत. हिंदू राष्ट्र हे परिवर्तनशील आहे, मागचे धरून ठेवत नाही आणि नवीन पकडूनही ठेवत नाहीत. म्हणजे जीन्स प्यांट आहे पण त्यावर कुर्ती आहे. कुर्ती आहे पण त्यावर ओढणी नाही, ओढणी नसली तर स्टोल असतो पण टिकली? ती नाही आहे. का नाही आहे? अं हं…ते विचारायचं नाही कारण त्याची उत्तरं एकतर समाधानकारक मिळणार नाहीत, किंवा अर्थशून्य अर्धवट भासू शकतील. अगदी परिधान केलेल्या वेशभूषा आणि केशभूषेप्रमाणे.

बाई, बाली, बायको ह्यांची वेगवेगळी मते टिकून आहेत. उत्तरं साधारणतः अशी मिळतील… मला टिकली चांगली दिसत नाही. शेजारची पण आजकाल टिकली लावत नाही. ती सध्या “इंन फॅशन” नाही. बॉलिवूड मधे तरी कुठे लावते ती नटी. टिकल्यांमध्ये चांगले ऑप्शन्स नाहीत.

आपले नवरे कुठे लावतात आपल्या नावाचं काही मग आपणच का लावायची? टिकल्या लावलेल्या बायका फारच बाळबोध आणि ग्रामीण दिसतात. टिकल्या लावलेल्या मुलींकडे मुलं बघत नाहीत. टिकली लावून आपण बावळट वाटतो. कशाला पाहिजे आहे टिकली फिकली. छान मॉडर्न राहावं बाईनी.

खरंतर टिकली हा वादाचा, चर्चेचा विषय नसून लावण्याचा विषय आहे. टिकली ज्याला आवडते तिने ती लावावी. लावायचा आग्रह असावा, हरकत नसावी, जबरदस्ती नसावी. एवढे स्वातंत्र्य आपल्याला आहेच”, असे तिने यात म्हटले आहे.

आणखी वाचा : “त्या नात्याबद्दल लपवण्यासारखे…” तब्बू- नागार्जुनच्या अफेअरच्या चर्चांवर पत्नीने केलेले जाहीर वक्तव्य

दरम्यान राधिकाची ही पोस्ट कायमच चर्चेत असते. सध्या ती या मालिकेत दिसत नाही. त्यामुळे तिने ही मालिका सोडल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राधिकाने यापूर्वी अनेक मराठी नाटक आणि चित्रपटात काम केली आहे. ‘व्हेनिला स्ट्राबेरी अँड चॉकेलट’, ‘होणार सून मी या घरची’, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ सारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aai kuthe kay karte serial devika actress radhika deshpande comment on bindi controversial statement nrp