सध्या बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव चर्चेत आहेत. या चर्चा त्या दोघांनी घटस्फोट घेत असल्याचे सांगितल्यानंतर सुरु झाल्या. आमिर आणि किरणने लग्नाच्या जवळपास १५ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याची माहिती दिली. त्यांची ही पोस्ट पाहून अनेकांना धक्का बसला होता. आता आमिर आणि किरणचा घटस्फोटानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते दोघेही डान्स करताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमिर आणि त्याची संपूर्ण टीम ही सध्या लडाखच्या वाखा या गावात त्यांचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’चे चित्रीकरण करत आहेत. वाखाच्या गावकऱ्यांनी आमिर आणि त्याच्या संपूर्ण टीमचे जोरदार स्वागत केले आहे. आमिर आणि किरणने लडाखच्या लोकांचा पारंपारिक लडाखी पोशाख परिधान करत त्यांच्या लोकनृत्यावर डान्स केला आहे.

त्यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ आमिरच्या फॅन क्लबने शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये आमिर आणि किरण डान्स करत असल्याचे दिसत आहे. आमिर आणि किरण लोकप्रिय लडाखी नृत्य ‘गोम्बा सुमशाक’ करताना दिसत आहेत. त्यांनी लडाखचे पारंपारिक कपडे सुल्मा आणि कोस परिधान केल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : ‘तुला लाज वाटायला हवी, तू मुस्लीम आहेस’, कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याने सारा झाली ट्रोल

त्यानंतर आमिरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आमिर काही लहान मुलांसोबत डान्स करताना दिसत आहे. ‘3 इडियट्स’ या चित्रपटात असलेले ‘ऑल इज वेल’ या गाण्यावर ते सगळे डान्स करताना दिसत आहेत.

आणखी वाचा : ‘माणूसकी आहे की नाही?’, ड्रायव्हरला पावसात भिजू दिल्याने सुझान आणि ताहिरा झाल्या ट्रोल

‘लाल सिंग चड्ढा’ हा टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान, मोना सिंग आणि नागा चैतन्यही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. हा चित्रपट यंदाच्या वर्षी ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan kiran rao dance together on laal sigh chaddha sets days after announcing divorce dcp