‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अभिजीत खांडकेकर. अभिजीतच्या पत्नीचं नाव सुखदा खांडकेकर असं असून ती देखील अभिजीत प्रमाणेच उत्तम अभिनेत्री आहे. आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याच्या जोरावर अभिनेत्री नृत्यांगना सुखदा खांडकेकर मराठी आणि हिंदी रंगभूमी गाजवत आहे. अभिजीत आणि सुखदा दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकमेकांबरोबरचे वेगवेगळे फोटोज आणि रील्स हे दोघेही शेअर करतात आणि त्यांच्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या व्हेकेशन टुरमधील काही फोटोज शेअर केले आहेत. सध्या अभिजीत आणि सुखदा हे दोघेही थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

आणखी वाचा : प्रभासचा ‘आदिपुरुष’ मोडणार शाहरुख खानच्या ‘पठाण’चे रेकॉर्ड; सिनेतज्ञांनी वर्तवला अंदाज

अशातच थायलंडच्या एका रम्य अशा समुद्र किनाऱ्यावर दोघेही एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवत आहेत. या बीचवर अभिजीत आणि सुखदा एकाच झोपाळ्यावर बसले आहेत आणि छान सूर्यास्ताचा आनंद घेत आहेत. सुखदा ही अभिजीतच्या मिठीत अतिशय आनंदी दिसत आहे.

सुखदाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटला हे फोटोज शेअर केले आहेत. त्यांच्या चाहत्यांनाही या दोघांचा हा रोमॅंटिक अंदाज प्रचंड आवडला आहे. या दोघांचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. सुखदाने काही मालिका, नाटक आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. संजय लीला भन्साली यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातही तिनं काम केलं आहे. याबरोबरच अभिजीतही चित्रपट आणि मालिका यांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhijeet khandkekar and sukhada khandkekar romantic photoshoot on thailand beach avn