अभिनेता अभिषेक बच्चनचा नुकताच ‘बिग बुल’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला काही प्रेक्षकांनी पसंती दिलीय तर काहींनी मात्र या सिनेमातील अभिनयावरून अभिषेकला ट्रोल केलंय. मात्र या सिनेमामुळे अभिषेक चर्चेत आला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अभिषेक बच्चनने दिवंगत अभिनेते ऋषी कपूर मुलावर म्हणजेच रणबीर कश्याप्रकारे पाळत ठेवायचे याबद्दल सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फिल्म कॅम्पेनियन या वेब साईटला दिलेल्या एका मुलाखतीत अभिषेकने दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि रणबीर कपूर यांच्याबद्दलची एक खास आठवण सांगितली आहे. अभिषेक म्हणाला, ” एकदा ऋषी कपूर सिमला इंथ शूटिंग करत होते. एक दिवस मी सकाळी त्यांच्या खोलीत गेलो. कारण त्यावेळी आम्ही एकत्र कॉफी प्यायचो. तेव्हा मी पाहिलं ते लूंगी घालून बसले होते आणि चष्मा लावून कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर काहीतरी पाहत होते. दूरनही ते मला खूप क्यूट वाटले.”

पुढे अभिषेक म्हणाला,” मी त्यांना विचारलं तुम्ही काय पाहत आहात. तेव्हा त्यांनी मला एका गॉसिप वेब साईट बद्दल सांगितंल. मी तर तिचं आधी नावंही ऐकलं नव्हतं. मी त्यांना विचारलं तुम्ही काय पाहताय? तेव्हा त्यांचं उत्तर थक्क करणार होतं. ते म्हणाले, अशाप्रकारे मी रणबीरवर नजर ठेवून असतो, तो काय करतोय ते मला कळतं. तेव्हा मला वाटलं हा माणूस कमाल आहे. जे मनाला वाटतं ते करुन टाकतो.” असं म्हणत अभिषेकने ऋषी कपूर कसे खास होते याबद्दल सांगितलं.

ऐश्वर्याने आराध्याला दिलीय ‘ही’ शिकवण; अभिषेक बच्चन म्हणाला तिला माहितेय..

‘बिग बुल’नंतर अभिषेक ‘दसवी’ सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तो एका राजकारण्याची भूमिका साकारणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachachan revealed how rishi kapoor spying on ranbir kapoor when he was shooting outdoor kpw