अभिनेता अंकित मोहनने फर्जंद या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अंकित हा अमराठी असून दिल्लीमधील चांदनी चौकात तो लहानाचा मोठा झाला. दिल्लीवरून २००६ मध्ये अंकित मोहन ‘रोडीज’शोमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईत आला होता. मात्र, एका अनोळखी शहरात स्वत:ची एक वेगळी ओळख बनवणे सोपे नव्हते. जीवनात कसा संघर्ष केला याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अंकित मोहनने खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “हनुमानासाठी राखीव जागा ठेवणं म्हणजे प्रमोशनल स्टंट…” ‘रामायण’फेम अरुण गोविल ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांवर संतापले

अंकित मोहन ‘राजश्री’ मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “२००६ मध्ये मी मुंबईत आलो. तेव्हा मी रोडीजमध्ये सहभागी झालो होतो, राहण्यासाठी घर नसल्याने एका बॅगेमध्ये सर्व सामान घेऊन इकडून तिकडे फिरायचो…वेळेप्रसंगी कुठेही राहायचो तो काळ कठीण होता. खिशात पैसे नसताना मी गुरुद्वारामध्ये जाऊन लंगर खाऊन पोट भरले आहे. अगदी उपाशी पोटी सुद्धा कामे केली आहेत. मी आयुष्यात खूप चढ-उतार अनुभवले आहेत.”

हेही वाचा : “संजय लीला भन्साळींची कॉपी केली” ‘रॉकी और रानी…’च्या टीझरमुळे करण जोहर ट्रोल; नेटकरी म्हणाले “नक्की काय दाखवायचंय…?”

अंकित पुढे म्हणाला, “एका खोलीत आम्ही ७ ते ८ जण राहत होतो, सगळे स्वत:च्या कामात व्यग्र असायचे. अकाऊंटमध्ये मोजकेच पैसे होते, हातात काम नव्हते, २० रुपयांची तिकीट काढून मी बसने दिवसभर प्रवास करायचो, कोणीही गॉडफादर नसल्यामुळे ऑडिशन्समध्ये यश मिळत नव्हते. या शहराने मला प्रत्येक गोष्ट शिकवली पण, मी कधीच हरलो नाही. मुंबईत आल्यावर तब्बल ३ ते ४ वर्षांनी मला चांगले काम मिळाले. पहिला चेक मिळाल्यावर मी दिल्लीला गेलो होतो. तेव्हा माझ्या आई-वडिलांसाठी मी एसी खरेदी केला होता. अशा सगळ्या घटना आयुष्यात घडत गेल्या…मी शिकत गेलो आणि आज मी इथवर पोहोचलो आहे.”

हेही वाचा : ‘टिकू वेड्स शेरू’साठी अवनीत कौरला संधी का दिली? कंगना रणौतने स्पष्टच सांगतिले, म्हणाली “बॉलीवूडमध्ये पैशापेक्षा खरं टॅलेंट…”

दरम्यान, अंकित मोहनने फर्जंद चित्रपटात साकारलेल्या कोंडाजी फर्जंद भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. लवकरच अंकित पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ‘रामशेज’ आणि ‘मुरारबाजी’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor ankit mohan remembers his struggle days in mumbai said no one was giving me work sva 00