गेल्याच वर्षी ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने अवघ्या ५२व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्यामुळे जगभरचे तमाम क्रिकेटप्रेमी हळहळले. नव्वदच्या दशकात आणि २००० मधील पहिल्या दशकात वॉर्नच्या जादुई फिरकीने क्रिकेटमधील या नजाकती कौशल्याला संजीवनी मिळाली. या दिवंगत फिरकीपटूच्या आयुष्यावर निघत असलेला चरित्रपट सध्या चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या बायोपिकच्या चित्रीकरणादरम्यान सेटवर एक अपघात घडल्याचं वृत्त समोर आलं आहे. या आगामी चित्रपटातील चक्क एक सेक्स सीन शूट करताना हा अपघात झालं असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय या दरम्यान चित्रपटातील प्रमुख अभिनेता अन् अभिनेत्री गंभीर जखमीदेखील झाले आहेत.

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’बद्दल प्रेक्षकांच्या मनात एवढा संताप का? चित्रपटातील ‘या’ सात गोष्टी ठरल्या कारणीभूत

ऑस्ट्रेलियातील ‘चॅनेल ९’च्या माध्यमातून हा बायोपिक साकारला जात आहे. या चित्रपटात अभिनेता अ‍ॅलेक्स विल्यम हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तर मॅरनी कॅनडी ही शेनच्या आधीच्या पत्नीची भूमिका निभावणार आहे. मॅरनी आणि अ‍ॅलेक्स या दोघांमधीलच एक सेक्स सीन शूट करतेवेळी हा अपघात झाला असल्याचं मॅरनीनेच ‘डेली ग्राफ’ला सांगितलं आहे. दोघांच्याही हाताला दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

शेन वॉर्नच्या या बायोपिकचा त्याचे चाहते बऱ्याच काळापासून विरोध करत आहेत. यापूर्वीच शेनच्या आयुष्यावर बेतलेला एक माहितीपट प्रदर्शित झाला आहे. ४ मार्च २०२२ रोजी शेन वॉर्नचं थायलंडमधील हॉटेलमध्ये आकस्मिक निधन झालं. वॉर्नचा मृत्यू ‘कार्डिअ‍ॅक अरेस्ट’मुळे झाल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं. त्याची हत्या झाल्याचंही काही लोकांचं म्हणणं होतं पण नंतर या गोष्टीत काहीच तथ्य आढळलं नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actors got injured during shooting of sex scene on the sets of shane warne biopic avn