आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. सध्या ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. मानसी नाईक ही लवकरच तिचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच मानसीने घटस्फोटासाठी अर्ज दिल्याची माहिती दिली होती. त्यानंतर ती सातत्याने चर्चेत आहे. घटस्फोटांच्या या वृत्तांच्या दरम्यान आता मानसीने एक पोस्ट शेअर करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानसी नाईक ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायमच इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी गाण्याबद्दल, चित्रपटाबद्दल पोस्ट शेअर करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या खासगी आयुष्याशी निगडीत भावूक पोस्ट करताना दिसत आहे. मानसी नाईकने घटस्फोटांच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. याला तिने हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण

मानसी नाईकची पोस्ट

“देव तुला आजही म्हणतोय की, मला कल्पना आहे की तू सध्या तुझ्या आयुष्यातील कठीण काळातून जात आहेस आणि याबरोबरच तू तुझ्या आयुष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीचाही सामना करत आहेस. त्याबरोबर भावनिक वेदनाही सहन करत आहेस.

असं दिसतंय की तुझ्या आयुष्यातून एखादी गोष्ट जाण्यापूर्वीच दुसरी मोठी गोष्ट घडते. तुझ्या आजूबाजूला कायमच वादळासारखी स्थिती असते. मात्र त्यात तू शांत राहायला हवं. धीर सोडू नये.

मी तुला अशा क्षेत्रात बळ देऊ इच्छितो जिथे तू सध्या पाहू देखील शकत नाही. तू आणि मी एकत्र मिळून यातून नक्कीच मार्ग काढू. जसे आपण नेहमी करतो. सगळं काही ठीक होईल.

तू निष्ठेला पात्र आहेस, तू प्रेमालाही पात्र आहेस आणि इतर सर्व मुलींप्रमाणे सर्व गोष्टींसाठी पात्र आहेस”, असेही मानसी नाईकने म्हटले आहे.

आणखी वाचा : “त्यांनी मित्राचा बुरखा पांघरला आणि…” घटस्फोटाच्या चर्चांवर मानसी नाईकने पहिल्यांदाच सोडलं मौन

दरम्यान मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण त्यानंतर त्या दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट केले होते. त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

अखेर ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मानसी नाईकने पहिल्यांदा मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडलं. “माझ्या घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खऱ्या आहेत. मी खोटं बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला आता सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूपच दुःखी आहे.” असे तिने म्हटले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress manasi naik thank you universe share instagram post goes viral nrp