‘सुपर डान्सर चॅप्टर ४’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो आहे. शनिवारी प्रदर्शित होणाऱ्या एपिसोडमध्ये अभिनेत्री तनुजा हजेरी लावणार आहेत. यावेळी त्यांच्या गाजलेल्या गाण्यांवर हे स्पर्धेत डान्स करणार आहेत. स्पर्धक अनीश तट्टीकोटा आणि त्याचा सुपर गुरु आकाश शेट्टी यांनी तनुजा यांच्या ‘मेरे जीवन साथी’ चित्रपटातील ‘चला जाता हूँ’ गाण्यावर परफॉर्म करून सगळ्यांना थक्क करून सोडले.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने दोघांचा हा परफॉर्मन्स खूप अप्रतिम असल्याचे सांगितले. विशेषतः सुपर गुरु आकाशचे तिने कौतुक केले. “हा परफॉर्मन्स म्हणजे जणू मला मिळालेली भेटच होती. या परफॉर्मन्समध्ये अनीशची जादू काही आगळीच होती,” असं शिल्पा म्हणाली.

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर इम्रानच्या पत्नीने केली होती ‘ही’ पोस्ट

अनीशचा तो परफॉर्मन्स पाहून तनुजा थक्क झाल्या होत्या. इतक्या लहान वयात तो ज्या सराईतपणे नाचतो हे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले. त्याच्या परफॉर्मन्सनंतर अनीशच्या आईने तनुजा यांना त्यांच्या आणि नूतन यांच्या नात्या विषयी विचारले. “नूतन माझ्यापेक्षा साडेसात वर्षं मोठी होती. त्यामुळे आमच्यात कधीच भांडण झाले नाही. कारण ती मला माझ्या आईसारखी होती. मी घरातले शेंडेफळ होते. सगळे जण माझे लाड करत,” असे तनुजा म्हणाल्या.

आणखी वाचा : ‘वडिलांच्या तिसऱ्या लग्नाची तयारी…’, बॉयफ्रेंड नुपुरसोबत शॉपिंगकेल्यामुळे आयरा झाली ट्रोल

पुढे आपल्या बहिणीशी आपले नाते कसे होते हे सांगताना तनुजा यांनी एक किस्सा सांगितला, “नूतन एका चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना त्यांनी तनुजा यांना धडा शिकवण्यासाठी बारा केळी खायला लावली होती आणि खरं तर तनुजा यांना केळी जराही आवडत नाही. आम्ही वाद घालायचो, भांडायचो पण आमचे एकमेकींवर प्रेम होते. जसे सगळ्या भावंडांचे असते तसेच आमचे नाते होते. काजोल आणि तनिशाचे देखील असेच आहे. त्यांच्यात वाद सतत चालू असतात आणि मला त्या दोघी त्यामध्ये हस्तक्षेप करू देत नाहीत, कारण त्यांच्या मते तो त्या दोघींचा प्रश्न आहे आणि त्या दोघी तो सोडवू शकतात.” बघा, सुपर डान्सर सत्र ४ दर शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर