अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थ डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून होत आहेत. काही दिवसांपूर्वी ते मुंबईत एकत्र दिसले होते. त्यानंतर सोमवारी या दोघांनी एनेमीच्या एका ट्रेंडिंग लोकप्रिय गाण्यावर नाचतानाचा एक रील पोस्ट केला. त्यानंतर दोघंही चांगलेच चर्चेत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चाहत्याने मृणाल ठाकूरला केलं प्रपोज; अभिनेत्री उत्तर देत म्हणाली, “माझ्याकडून या नात्याला…”

व्हिडीओमध्ये अदिती साध्या फ्लॉवर प्रिंटेड शरारा सूटमध्ये सुंदर दिसत होती, तर सिद्धार्थने कॅज्युअल ब्लॅक शर्ट व ब्लू जिन्स घातली होती. या गाण्याच्या हूक स्टेप करत त्यांनी एकमेकांशी स्टेप्स मॅच केल्या. “डान्स मंकीज – द रील डील,” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे.

अदिती व सिद्धार्थच्या डेटिंगच्या चर्चा जवळपास वर्षभरापासून होत आहे. त्यामुळे अदितीने हा व्हिडीओ टाकल्यावर हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोफी चौधरी, दिया मिर्झा, पत्रलेखा यांनीही कमेंट्स केल्या आहेत. रीलमधले दोन्ही माकड आपले फेव्हरेट असल्याचं पत्रलेखा म्हणाली. दोन्ही माकड खूप क्युट असल्याचं सोफी म्हणाली. त्यांचे चाहतेही या व्हिडीओवर हार्ट इमोजी कमेंट करत आहेत. दोघांच्या लग्नाबद्दलही चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘तुमच्या लग्नाची वाट पाहतोय, लवकर घोषणा करा,’ अशा कमेंट्सही त्या व्हिडीओवर पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ एकत्र लंचसाठी गेले होते. तसेच ते हैद्राबादमध्ये शर्वानंदच्या एंगेजमेंटलाही एकत्र गेले होते. अदिती आणि सिद्धार्थ यांनी २०२१ मध्ये रिलीज झालेल्या ‘महा समुद्रम’ या रोमँटिक अॅक्शन चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditi rao hydari and siddharth dance on tum tum viral video hrc