वीजे आणि अभिनेत्री अनुषा दांडेकरचे लाखो चाहते आहेत. अनुषा अभिनेता करण कुंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. गेल्या वर्षी करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकरच्या ब्रेकअपच्या मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अनुषा आता छोट्यापडद्यावरील एका अभिनेत्यासोबत रिलेशनमध्ये आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

‘झांसी की राणी’ या मालिकेत भूमिका साकारणारा अभिनेता जेसन आणि अनुषा रिलेशनशिपमध्ये आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, जेसनने या बातमीला दुजोरा दिला आहे. हे दोघे एका म्युझिक व्हिडीओच्या सेटवर भेटले होते. तिथेच त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. “ती माझ्या जीवनात आल्यापासून माझे जीवन सुंदर झाले आहे. कारण ती वर्तमानात जगण्यात विश्वास ठेवते,”असे जेसन म्हणाला. त्या दोघांनी अजुन लग्नाचा विचार केलेला नाही, मात्र त्या दोघांमधील प्रेम हे त्यांच्या चाहत्यांना दिसून येत आहे.

१७ मार्च रोजी अनुषाने सोशल मीडियावर जेसन सोबत एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अनुषासोबत जेसन दिसत आहे. जेसन शर्टसेल उभा आहे. “जेव्हा आपला दिग्दर्शक असा दिसतो तेव्हा…हॅलो जेसन” अशा आशयाचे कॅप्शन अनुषाने दिले आहे. या दोघांची जोडी अप्रतिम दिसत आहे. जेसन अनुषाची बहिण शिबानी दांडेकरला देखील ओळखतो.

दरम्यान, अनुषाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत करण कुंद्राने तिला फसवल्याचं म्हंटलं आहे. नुकतच अनुषाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांसोबत संवाद साधला. या “आस्क मी एनी थिंग” सेशनमध्ये तिने ब्रेकअपबद्दल सांगितले.