येत्या काळात हॉलिवूड आणि बॉलिवूड सिलिब्रिटींच्या जागी प्रत्येक सिनेमात यंत्रमानव झळकल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण येणारा काळ हा तंत्रज्ञानाच्या बाबतीत अधिक अधिक प्रगती करणारा आहे. अभिनय क्षेत्रात हॉलिवूडमध्ये तर आधीच यंत्रमानवाच्या पदार्पणाची तयारी सुरु आहे. यातच आता तुर्कीमध्ये देखील एका यंत्रमानवाने एक सिनेमा साइन केला आहे.

होय हे प्रत्यक्षात घडू लागलं आहे. आतापर्यंत सिनेमांमध्ये वि एफ एस्क (VFX) तंत्रज्ञानाच्या मदतीने युद्ध परिस्थिती किंवा रोबोट चित्रीत केले जातं होते. मात्र आता प्रत्यक्षात रोबोटचं सिनेमामध्ये अभिनय करणार आहेत. हॉलिवूडमध्ये निर्माते सॅम खोझे आणि अनौश सादेघ अशा एका सिनेमाची निर्मिती करत असून या सिनेमाचं नाव ‘बी’ असं आहे. या सिनेमात ‘एरिका’ नावाची रोबोट मुख्य भूमिका साकारणार आहे.

हॉलिवूडनंतर आता एका तुर्की सिनेमातही ‘आयपेरा’ ही रोबोट अभिनय करण्यासाठी सज्ज झालीय. ‘डिजिटल ह्यूमन’ असं या सिनेमातं नाव असून आयपेरा या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. आयपेराने या सिनेमाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे आणि तिने मुलाखतीही दिल्या. निर्माते आणि पटकथा लेखक बिरोल गुव्हेन या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. रोबोट आणि माणसांना एकत्र आणणाऱ्या या सिनेमाचं चित्रीकरण सष्टेंबर महिन्यात सुरु होणार आहे. तर २०२२ सालात हा सिनेमा प्रदर्शित होईल.

मला डिजिटल अ‍ॅक्टर म्हणून ओळखलं जावं

एका मुलाखतीत आयपेराने ती हा सिनेमा करण्यासाठी ती खूप उत्सुक असल्याचं म्हंटलं आहे. रोबोट अभिनेत्री या संकल्पनेबद्दल सांगताना ती म्हणाली, “मला डिजिटल अ‍ॅक्टर म्हणून ओळखलं जावं अशी माझी इच्छा आहे. मात्र मला माहितेय लोकांना त्यांच्या आवडीचा शब्द बोलण्याची सवय असते. त्यामुळे मला ते रोबोटच म्हणतात. पण मला याच काही वाईट वाटतं नाही.” असं आयपेरा म्हणाली.

इस्तंबूलमध्ये ६ जून पर्यंत ‘कंटेम्पररी इस्तंबूल’ या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या महोत्सवातील “प्लग इन न्यू मीडिया सेक्शन’मध्ये ती भाग घेणार आहे. त्यामुळे अनेकांना तिच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल.

दरम्यान निर्माते बिरोल गुव्हेन म्हणाले, “येत्या काळात मोठ्या पदड्यावर रोबोट झळकताना दिसतील.दरम्यान निर्माते बिरोल गुव्हेन म्हणाले, “येत्या काळात मोठ्या पदड्यावर रोबोट झळकताना दिसतील. एवढचं नाही तर मला येत्या काळात या बदलाचा प्रणेता व्हायचं आहे. त्यामुळे येत्या काळात रोबोट निर्माते तसचं रोबोट लेखक उदयाला येतील असं मला वाटतं.”

निर्मात्याच्या या वक्तव्यावरून आता यंत्र मानवच येत्या काळात अभयन क्षेत्रात आपला जम बसवणार की काय असं चित्र निर्माण झालंय