बॉलिवूडमधील अक्षय कुमार आणि ह्रतिक रोशन या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या ह्रतिक आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘मोहंजोदडो’ चित्रपटात व्यग्र आहे. तर अक्षय कुमार नीरज पांडे दिग्दर्शित ‘रुस्तम’ चित्रपटासाठीचे चित्रीकरण करत आहे. अक्षयचा हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. ‘मोहंजोदडो’ १२ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे, तर ‘रुस्तम’देखील याच दिवशी चित्रपटरसिकांच्या भेटीसाठी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
अक्षय आणि ऋतिकचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवरील ही सर्वात मोठी लढत मानली जात आहे. यात कोण बाजी मारतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
‘मोहंजोदडो’ चित्रपटाद्वारे पूजा हेगडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. चित्रपटात कबीर बेदींचादेखील अभिनय पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील इस पूर्व २६०० मध्ये अस्तित्वात असलेल्या सिंधू संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या मोहजोदडो शहराच्या पार्श्वभूमीवर दर्शविण्यात आलेली साहस आणि प्रेम कथा या चित्रपटात अनुभवायला मिळेल. तर अक्षयचा ‘रुस्तम’ चित्रपट सत्यघटनेवर बेतला असून यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘एअरलिफ्ट’ या त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस यश संपादन केले होते. ‘एअरलिफ्ट’देखील सत्य घटनेवर आधारित चित्रपट होता.
एकाच दिवशी प्रदर्शित होणारे ‘रुस्तम’ आणि ‘मोहंजोदडो’ हे अक्षय आणि ह्रतिकचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना कशी टक्कर देतात हे पाहणे त्यांच्या चाहत्यांसाठी औत्सुक्याचे ठरणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Apr 2016 रोजी प्रकाशित
अक्षय आणि ह्रतिकच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर, कोण मारेल बाजी?
बॉलिवूडमधील अक्षय कुमार आणि ह्रतिक रोशन या दोन दिग्गज अभिनेत्यांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 11-04-2016 at 14:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After sultan vs raees akshay kumars rustom to clash with hrithik roshans mohenjo daro at the box office this august