गेल्या काही दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या अनेक सिनेमांची घोषणा होतेय. लवकरच अमेझॉन प्राइम व्हिडिओवर ‘हेलो चार्ली’ हा कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
या विनोदी सिनेमात जैकी श्रॉफ, आदर जैन, एलनाज नौरोजी आणि राजपाल यादव आणि भारत गणेशपुरे अशी स्टारकास्ट आहे. तर अभिनेत्री श्लोका पंडित मुख्य भूमिकेत झळकणार असून तिचं हे पदार्पण आहे.
‘हेलो चार्ली’ चा ट्रेलर एका ऍडव्हेंचर कॉमेडीच्या अनोख्या दुनियेत आपल्याला घेऊन जातो . या सिनेमात गोरिल्ला टोटो आणि साधासुधा चार्ली यांची मजेदार केमिस्ट्री पहायला मिळेल.हा चित्रपट आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवत एका कुतूहलपूर्ण प्रवास घडवतो ज्यामध्ये, एक करोड़पती व्यक्तीच्या पलायन नाट्या वरून होणाऱ्या गोंधळाची संपूर्ण साखळी तयार होते आणि विचित्र अवस्था निर्माण करते. ‘हेलो चार्ली’ नक्कीच प्रेक्षकांना हसवत लोटपोट करून टाकेल.
या ट्रेलरविषयी अभिनेता जैकी श्रॉफ म्हणाले की, “ कोणत्याही विनोदी सिनेमात काम करताना मला नेहमीच खूप मजा येते, मात्र तुम्हाला हे कळायला हवे की या जॉनरचा चित्रपट करणं सोप काम नाही. इतक्या कठीण सिनेमाला इतक्या सोपेपणाने बनवण्याचं श्रेय दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांच्या शानदार टीमला जातं. प्रतिभाशाली कलाकार आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमसोबत ‘हेलो चार्ली’ मध्ये काम करण्याचा अनुभव खरोखर मजेदार होता.”
ट्रेलर लॉन्च होताना अभिनेता आदर जैनने मोठ्या उत्साहाने सांगितलं की, “मी या गोष्टीमुळे प्रचंड रोमांचित झालो आहे की आमचा ट्रेलर आला आहे आणि अखेरीस प्रेक्षकांना ‘हेलो चार्ली’ च्या अनोख्या जगाची झलक पहायला मिळणार आहे. मी जैकी सर, फरहान सर, रितेश सर, पंकज सर, श्लोका आणि टीमच्या बाकी सदस्यांसोबत काम करताना धमाल वेळ घालवला आहे.”
ट्रेलर वर बोलताना नवोदित अभिनेत्री श्लोका पंडित म्हणाली की, “संक्षेपाने सांगायचे झाले तर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही आहे. ही माझा पहिलाच सिनेमा असून पहिल्याच चित्रपटात जैकी सर, आदर आणि राजपाल सरांसोबत काम करताना मी स्वत:ला भाग्यशाली आणि नशीबवान मानते. एक्सेल एंटरटेनमेंट आणि आमचे दिग्दर्शक पंकज सारस्वत यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शिकवणारा ठरला आहे.”
भारतासोबतच अन्य 240 देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम सदस्य 9 एप्रिल, 2021 ला या सिनेमाचा ग्लोबल प्रीमियर पाहू शकतील.