बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अमिताभ यांनी नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवरून नेटकऱ्यांनी अमिताभ यांना ट्रोल केले आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अमिताभ यांनी पिवळ्या रंगाची हूडी परिधान केल्याचे दिसत आहे. त्यांच्या हातात कुत्र्याचे एक छोटे पिल्लू देखील आहे. हा फोटो शेअर करत “.. सेटवर माझी नवीन सोबती .. माझ्या कुशीत एकदम आरामात आहे…तिला घरी घेऊन यायची खूप इच्छा होती..पण..”, अशा आशयाचे कॅप्शन त्यांनी दिले आहे.
आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर इम्रानच्या पत्नीने केली होती ‘ही’ पोस्ट
त्यांचा हा फोटो पाहिल्यानंतर त्यांची मुलगी श्वेताने विचारले की ‘पण?’ तर त्यांची नात म्हणाली, ‘तुम्ही तिला घरी आणायला पाहिजे होते…’ तर एक नेटकरी अमिताभ यांना ट्रोल करत म्हणाला, ‘जया मॅडम ओरडतील.’
अमिताभ सध्या नीना गुप्ता यांच्यासोबत ‘गुडबाय’ चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत. ‘गुडबाय’चे चित्रीकरण करोना संसर्गामुळे थांबविण्यात आलं होतं. आता परिस्थितीती ठीक होत असल्यामुळे पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत आहे.