Anant Ambani & Radhika Merchant Reception : अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्याची गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा चालू आहे. १२ जुलैला या जोडप्याचा विवाहसोहळा बीकेसी येथील ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’मध्ये थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात देश-विदेशातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. बॉलीवूडपासून ते हॉलीवूडपर्यंत अनेक कलाकारांनी या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली होती. गेल्या चार महिन्यांपासून अंबानींच्या घरी विविध कार्यक्रम चालू होते. अखेर अनंत-राधिका आता लग्नबंधनात अडकले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनंत-राधिकाचा साखरपुडा गेल्यावर्षी पार पडला होता. यानंतर यंदाच्या मार्च महिन्यात या दोघांचा पहिला प्री-वेडिंग सोहळा गुजरातमधील जामनगर येथे पार पडला होता. मे महिन्याच्या अखेरिस या जोडप्याच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याचं इटली ते फ्रान्स दरम्यानच्या क्रुझवर आयोजन करण्यात आलं होतं.

गेल्या काही आठवड्यापासून अनंत-राधिकाच्या लग्नाचं जंगी सेलिब्रेशन चालू आहे. १२ जुलैला यांचा विवाहसोहळा बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला. यानंतर शनिवारी ( १३ जुलै ) अनंत-राधिकाचा ‘शुभ आशीर्वाद’ कार्यक्रम संपन्न झाला. रविवारी या जोडप्याने खास रिसेप्शन पार्टीचं आयोजन केलं होतं.

हेही वाचा : Anant Ambani Wedding Reception : अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या रिसेप्शनला मराठमोळ्या अमृता खानविलकरची हजेरी, अभिनेत्रीने शेअर केला खास व्हिडीओ

नीता अंबानी यांच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

नीता अंबानी यांनी मुलाच्या रिसेप्शन सोहळ्यात माध्यमांसमोर येऊन सर्वांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, “नमस्कार…तुम्ही सगळे एवढ्या दिवसांपासून माझ्या अनंत आणि राधिकाच्या लग्नाला उपस्थित आहात. तुमचे मनापासून आभार… हे लग्नघर आहे आणि तुम्ही आमच्या आनंदात सहभागी झालात ही मोठी गोष्ट आहे. आमच्याकडून काही चूक झाली असेल तर हे लग्नघर आहे असं समजून आम्हाला माफ करा आणि उद्याच्या पार्टीत नक्की सहभागी आहे. या पार्टीचं आयोजन खास तुम्हा सर्वांसाठी केलं आहे.”

नीता अंबानींचा हा व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या पापाराझी पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. एवढ्या श्रीमंत घरच्या असूनही त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत सर्वांचे आभार मानले याकरता त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. “बॉलीवूड सेलिब्रिटींपेक्षा या खूप चांगल्या आहेत”, “नीता अंबानींचं मन खूप मोठं आहे”, “कोणीतरी जया बच्चन यांना हा व्हिडीओ पाठवा आणि मीडियाशी सौम्य भाषेत कसं बोलावं हे सांगा” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा : Anant Ambani Wedding: अनंत अंबानीने लग्नसोहळ्यात ‘या’ कलाकारांना दिली २ कोटींची भेटवस्तू; नेटकरी म्हणाले, “म्हणूनच एवढ्या उत्साहात…”

नीता अंबानी यांच्या व्हिडीओवरील कमेंट्स

हेही वाचा : Anant Radhika Wedding: पंतप्रधान मोदींच्या शेजारी पतीसह बसलेल्या श्लोका अंबानींला लागली डुलकी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

दरम्यान, १२ ते १४ जुलै दरम्यान अनंत-राधिकाचा लग्नसोहळा पार पडला. यानंतर १५ जुलै रोजी ( सोमवार ) या सोहळ्याला हातभार लावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अंबानी कुटुंबीयांकडून खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. सध्या संपूर्ण जगभरातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant ambani and radhika merchant reception nita ambani thanked everyone netizens praised her video viral sva 00
Show comments