“पनीरवर GST दिल्यानंतर लोक चित्रपट पाहण्यासाठी पैसा…” अनुराग कश्यपचं विधान चर्चेत

चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरण्यावर अनुराग कश्यपने प्रतिक्रिया दिली आहे.

“पनीरवर GST दिल्यानंतर लोक चित्रपट पाहण्यासाठी पैसा…” अनुराग कश्यपचं विधान चर्चेत
चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरण्यावर अनुराग कश्यपने प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप अनेकदा आपलं मत अगदी मोकळेपणाने मांडताना दिसतो. सामाजिक असो वा राजकीय जवळपास प्रत्येक मुद्द्यावर तो व्यक्त होताना आणि प्रतिक्रिया देताना दिसतो. आतापर्यंत अनेक हिट चित्रपट देणारा प्रतिक्रिया देणारा अनुराग कश्यप परखड शब्दात आपलं मत मांडताना दिसतो. सध्या अनुराग त्याच्या ‘दोबारा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनुराग कश्यपने हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

अनुराग कश्यपने बॉलिवूडची सद्यस्थिती आणि दाक्षिणात्य चित्रपटाना मिळाणाऱ्या यशावर भाष्य केलं. अनुरागच्या मते बॉलिवूडची परिस्थिती एवढीही गंभीर नाही जेवढं त्याच्याबद्दल नकरात्मक बोललं जात आहे. ‘टाइम्स नाऊ’शी बोलताना अनुराग म्हणाला, “तुम्हाला कसं कळतंय की दाक्षिणात्य चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतायत. तेलुगूमध्ये एखादा चित्रपट चालतो. तमिळ आणि कन्नडमध्ये तसंच आहे. तिथला प्रत्येक चित्रपट काम करत आहे हे तुम्हाला कसं कळतं? मागच्या आठवड्यात कोणता चित्रपट प्रदर्शित झाला याची तुम्हाला कल्पना नसेल. कारण कोणी त्या चित्रपटाकडे फिरकतही नाही.”
आणखी वाचा- “आमिर खानची काय चूक…” ‘लाल सिंग चड्ढा’ला प्रेक्षकांच्या थंड प्रतिसादावर मोना सिंगची नाराजी

अनुराग कश्यप पुढे म्हणतो, “मुख्य समस्या ही आहे की लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. पनीरवर जीएसटी लावण्यात आला आहे. तुम्ही खाद्यपदार्थांवर जीएसटी आकारत आहात. त्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी हा बहिष्काराचा खेळ खेळला जात आहे. लोक चित्रपट पाहण्यासाठी जातात जेव्हा त्यांना खात्री असते की चित्रपट चांगला आहे किंवा ते वर्षानुवर्षे त्याची वाट पाहत असतात. पण खाद्यपदार्थांवर जीएसटी लावल्यानंतर लोक चित्रपट पाहण्यासाठी पैसे कुठून आणतील.”

आणखी वाचा- चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीचं अनुराग कश्यपनं केलं समर्थन, कारण देत म्हणाला…

अलिकडच्या हिंदी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरील सुमार कलेक्शनची आणखी काही कारणं सांगताना अनुराग म्हणाला, “लोकांना चांगला सिनेमा बघायचा आहे. मला मान्य आहे की अलिकडच्या काळात असे काही चांगले चित्रपट आहेत जे चालले नाहीत पण आपण आर्थिक मंदीतून जात आहोत हे समजून घेतलं पाहिजे. आज बिस्किटे, पनीर या मूलभूत वस्तूंवर कर आकारला जात आहे. चित्रपट आपले मनोरंजन करेल याची खात्री होईपर्यंत लोक महागडी चित्रपटाची तिकिटं खरेदी करतील असं तुम्हाला वाटतं का? तसंच, चित्रपट कंटाळवाणे असतील तर प्रेक्षकांना त्यात रुची वाटत नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दाक्षिणात्य चित्रपट समीक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, धनुष, विजय देवरकोंडाने वाहिली श्रद्धांजली
फोटो गॅलरी