Badlapur Sexual Assault : बदलापूरमधल्या दोन चिमुरड्यांवर त्यांच्या शाळेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार ( Badlapur Sexual Assault ) केला. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. २० ऑगस्टच्या दिवशी बदलापूरमध्ये लोकांनी उत्स्फुर्तपणे आंदोलन केलं. या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात येते आहे. त्यासाठी एक दिवसाचं आंदोलनही झालं.

२० ऑगस्टला काय घडलं?

बदलापूरमधल्या एका नामांकित शाळेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदेने दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ( Badlapur Sexual Assault ) उघडकीस आली. यानंतर २० ऑगस्टला बदलापूरमध्ये प्रचंड जनक्षोभ पाहण्यास मिळाला. संतप्त जमावाने शाळेची तोडफोड केली. रेल रोको केला. आता या प्रकरणावरुन हास्यजत्रा फेम अभिनेता श्रमेश बेटकरने एक पोस्ट लिहिली आहे.

हे पण वाचा- Bombay High Court on Badlapur Case: “४ वर्षांच्या मुलींनाही सोडलं जात नाहीये, ही काय स्थिती आहे?” उच्च न्यायालयाने बदलापूर पोलिसांना फटकारलं; तपासावर ताशेरे!

श्रमेश बेटकरची पोस्ट काय?

व्यवस्थेच्या अवस्थेला पत्र :
अप्रिय व्यवस्था ,
तुला माहीतच असेल की रेप हा ‘गुन्हा’आहे , पण काही पुरुषांना ते ‘कर्तव्य’ वाटू लागलंय . म्हणूनच रेप ही फॅशन होण्याअगोदर व्यवस्थेने जागं व्हावं. ‘बाईचा जन्म नको गं बाई’ इथपासुन सुरु झालेला प्रवास “या देशात जन्म नको गं बाई” इथे आणून ठेवू नका .. कायदे हे कायदे वाटले पाहिजेत ते चेष्टा वाटू लागली कि मग संपतं सगळं .. ‘अंमलबजावणी’ नावाचा एक मराठी शब्द आहे, व्यवस्थेने तो वाचावा, त्याचा अर्थ मस्त आहे. विकृतांना धाक बसेल अशी पावलं उचलावीत. स्त्रीचा जन्म सन्मानासाठी आहे. तो तिला मिळालाच पाहिजे आणि त्या सन्मानाचं रक्षण झालं पाहिजे , ती जबाबदारी जितकी समाजाची तितकीच व्यवस्थेची आहे. कारण जबरदस्तीने कपडे स्त्रीचे काढले जातात पण व्यवस्था ‘नग्न’ होते आणि प्लीज आता आरोपीना ‘मी स्त्री असतो तर’ , ‘स्त्री तुझा जन्म कसा’ असे ‘निबंध’ लिहायला सांगू नका.

श्रमेश बेटकर

अभिनेता श्रमेश बेटकरची पोस्ट चर्चेत

अशी पोस्ट अभिनेता श्रमेश बेटकरने लिहिली आहे.बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार ( Badlapur Sexual Assault ) करण्यात आला. शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने हे अत्यंत घृणास्पद कृत्य ( Badlapur Sexual Assault ) केलं. याबाबत आता अभिनेता श्रमेश बेटकरने डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट केली आहे. महाराष्ट्राचं हास्यजत्रा या कार्यक्रमात स्किट सादर करुन मनमुराद हसवण्याचं काम श्रमेश बेटकर कायमच करतो. मात्र त्याने बदलापूरच्या घटनेवर केलेली ही पोस्ट नक्कीच विचार करण्यासारखी आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.