सहज एकदा जाता जाता.. म्हणून न्यायालयाची पायरी चढलेला एक पंचविशीचा तरुण. ‘न्यायव्यवस्था’ अशी एक मोठी यंत्रणा आहे ज्यात सर्वसामान्यांच्या किरकोळ भांडणांपासून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी, दहशतवादाच्या प्रकरणांवर वादविवाद करून न्याय दिला जातो. एरवी चित्रपटांमधूनच आपण
एकत्रित प्रयत्नांची परिणती
हिंदूी नाटकातून मी काम केले आहे. सुनील शर्मा यांचे एक नाटक करत असताना चित्रपटासाठी पात्रांची निवड करणाऱ्या सचिन पुराणिक यांनी ‘कोर्ट’च्या ऑडिशन सुरू आहेत तू जाऊन ये असे सांगितले. त्यावेळी
काम करताना मजा आली
‘कोर्ट’ या चित्रपटात ज्या लोकशाहिरांचा लढा लढवला गेला आहे त्यांची भूमिका नागपूरच्या वीरा साथीदार यांनी केली आहे. नागपुरात एका मासिकाचे काम पाहणाऱ्या वीरा यांचा चित्रपट क्षेत्राशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. त्यांचा संबंध योगायोगाने सामाजिक कार्य करणाऱ्या वकिलांशी आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या ‘कोर्ट’च्या टीमशी आला. ‘माझा चित्रपट क्षेत्राशी याअगोदर कधीही संबंध आलेला नव्हता. आमच्याकडील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आदी जिल्हे म्हटले तर सगळ्याच बाबतीत मागे. त्यामुळे चित्रपट करणे हे फक्त
शाहिराची भूमिका माझ्यासाठी ओळखीची होती. शाहीर अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक, विलास घोंगळे यांची शाहिरी मी ऐकली होती. त्यांचा प्रभाव माझ्यावर होता. शिवाय, स्वत: सामाजिक चळवळींचा अभ्यासक असल्याने या गोष्टी माझ्यात भिनलेल्या होत्या. चित्रपटातील माझी भूमिका पाहून दिग्दर्शकांनी त्यासाठी माझी केलेली निवड योग्य आहे, असे प्रेक्षकांनाही नक्कीच वाटेल,असे ते विश्वासाने सांगतात. पहिल्यांदाच चित्रपट करताना खूप मजा आली, असे त्यांचे म्हणणे. म्हणजे चित्रपटक्षेत्राशी संबंधित माणसांची एक विकृत प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली असते. ते पैसे बुडवतात, कलाकारांचा वापर करून घेतात अशा एक ना अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. मात्र, ‘कोर्ट’ करतानाचा अनुभव फार वेगळा होता. हा चित्रपट करताना खूप शिकायलाही मिळाले. कलावंतांबद्दल आदर असला पाहिजे, याचे भान असणाऱ्या मंडळींनी हा चित्रपट केला आहे, असे वीरा यांनी सांगितले.
जीवनानुभवाची ‘पायरी’
मी मूळचा मुंबईचाच. मिठीबाई महाविद्यालयात असताना एकांकिका स्पर्धा आणि अन्य उपक्रमांत नेहमीच सहभागी व्हायचो. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक माहितीपट, लघुपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले होते. ‘कोर्ट’ हा माझा पहिलाच मराठी चित्रपट. एकदा मुंबईतील ‘अनाडी कोर्ट’मध्ये जाण्याचा प्रसंग आला. तेथे येणारे किंवा पकडून आणले जाणारे लोक, पोलीस आणि वकील यांच्यातील संभाषण, या
या चित्रपटात तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत सगळेच नवीन किंबहुना चित्रपट क्षेत्राशी कधीही संबंध न आलेले लोक आहेत. यामागचे कारणही चैतन्यने स्पष्ट केले. मुळात चित्रपटनिर्मितीचे असे कोणतेही शिक्षण मी घेतले नव्हते. मला जी कथा सुचली होती ती लोकांसमोर आणण्याचे माध्यम म्हणून मी सिनेमाची निवड केली होती. कारण या माध्यमातून तो कथाविचार सर्वदूर पोहोचेल ही खात्री होती. पण म्हणून चित्रपट करताना माझ्यापेक्षा या विषयातल्या जाणकाराला नियुक्त करून त्याच्या मार्गदर्शनाखाली काम करणे मला अजिबात जमणारे नव्हते. त्यामुळे स्वत:च शिकत चित्रपट करायचा होता आणि त्याच कारणासाठी चित्रपटात कलाकार म्हणून लोकांना परिचित असलेला चेहराही मला नको होता. मी ते मुद्दामच केले. अनुभवी कलाकार आणि मंडळींपासून मी लांबच राहिलो. ‘कोर्ट’ चित्रपटाच्या चमूला प्रत्यक्ष चित्रपटाशी संबंधित अनुभव नसेल, पण आम्हा सगळ्यांकडे जीवनानुभव होता आणि त्याच्याच जोरावर आम्ही हे शिवधनुष्य पेलले आहे, असे तो सांगतो. इतरांप्रमाणेच चैतन्यलाही लहानपणापासूनच चित्रपटाचे खूप आकर्षण आहे. पण हातात पैसे नसतील तर आणि आर्थिक गणित जमले नाही तर मनात असूनही काही करता येत नाही. विवेक गोम्बर यांच्यासारखा निर्माता आम्हाला मिळाला आणि हा चित्रपट तयार झाला, असे सांगणाऱ्या चैतन्यने पुढच्या चित्रपटासाठी पैसे नसतील तर करणार नाही, हेही तितक्याच ठामपणे सांगितले. चित्रपट या माध्यमाला भरपूर पैसे लागतात. अपुऱ्या पैशात दर्जाशी तडजोड करून चित्रपट बनवण्यात अर्थ नाही. चित्रपट करणे शक्य झाले नसते तर ब्लॉग किंवा कादंबरी अशा माध्यमातून मी मनातील विचार लोकांपुढे मांडले असते. आपण कुठेतरी आणि कोणत्याही माध्यमातून व्यक्त होणे महत्त्वाचे असते, असे तो म्हणतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध पुरस्कार मिळाल्याने लोकांमध्येही ‘कोर्ट’बाबतची उत्सुकता वाढलेली आहे. प्रसारमाध्यमांतून हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचला आहे. तसेच चित्रपटाला इंग्रजी सबटायटल्स दिली असून हा चित्रपट महाराष्ट्रासह नवी दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आदी ठिकाणीही प्रदर्शित करत आहोत. देशभरातील समीक्षकांनीही ‘कोर्ट’चे कौतुक केले आहे. त्यामुळे हा चित्रपट मराठीतून असला तरी तो केवळ मराठी प्रेक्षकांपुरताच मर्यादित राहील, अशी भीती आपल्याला वाटत नसल्याचे चैतन्यने सांगितले.
अभ्यास करूनच निर्मिती
‘कोर्ट’ चित्रपटासाठी निर्माता आणि अभिनेता अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणारे विवेक गोम्बर हे खरे तर या चित्रपट संकल्पनेच्या पातळीवर असल्यापासून चैतन्यबरोबर आहेत. ‘तीन वर्षांपूर्वी चैतन्य आणि माझी भेट झाली. चैतन्यने दिग्दर्शित केलेल्या नाटकात मी काम केले आणि तेव्हापासून मी त्याला ओळखायला लागलो होतो. त्यावेळी चैतन्य आयुष्याच्या एका वळणावर उभा होता. त्याच्या मनात ‘कोर्ट’चा विचार सुरू होता. मात्र त्यावर चित्रपट करण्याएवढी आर्थिक क्षमता नव्हती. गप्पागप्पांमधून हा विषय मला समजला. चैतन्यचे
‘कोर्ट’ चित्रपटाच्या टीमसोबतच्या गप्पांचे सर्व व्हिडिओ ‘लोकसत्ता’च्या ww.youtube.com/LoksattaLive या चॅनेलवर पहायला मिळतील.