‘भाभीजी घर पर है’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील मनमोहन तिवारपासून अंगूरी भाभी, गोरी मॅम आणि विभूती या सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या सगळ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय होतं हे आपल्याला जाणून घेण्याची इच्छा असते. तर, आज आपण मनमोहन तिवारीची भूमिका साकारणाऱ्या रोहिताश्व गौरच्या मुली विषयी जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा : मनोज वाजपेयीची पत्नी शबानावर नाव बदलण्यासाठी टाकण्यात आला होता दबाव

रोहिताश्वला दोन मुली आहेत. आज आपण त्याची मोठी मुलगी गिती गौरबद्दल जाणून घेणार आहोत. गिती एक मॉडेल आहे. गिती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती सतत सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करताना दिसते. गिती अमित मिश्राच्या ‘I WILL ALWAYS BLINDLY LOVE YOU’ या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली आहे.

आणखी वाचा : ‘केआरके कुत्ता है’ गाण्यावरुन वाद, कमाल खानने दिली मिका सिंगला धमकी

या गाण्याच्या प्रदर्शनानंतर एका मुलाखतीत गिती म्हणाली होती की तिला बॉलिवूडमध्ये काम करायचं आहे. तर, फक्त बॉलिवूड नाही तर हॉलिवूडमध्ये ही तिला काम करायचं आहे. तिला ऑस्कर जिंकायचा आहे. जेव्हा तिच्या वडिलांना वेळ मिळतो. तेव्हा ते तिला अभिनयाचे धडे देतात.

गिता फक्त एक मॉडेल आणि अभिनेत्री नाही तर एक उत्तम डान्सर देखील आहे. तिचं एक युट्युब चॅनलं असून तिथे ती तिचे डान्स व्हिडीओ शेअर करताना दिसते. आता लवकरच गिता बॉलिवूडमध्ये एण्ट्री करणार आहे.