‘भाभी जी घर पर है’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेत ‘अम्माजी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोमा राठोड यांचे ही लाखो चाहते आहेत. सोमा यांचे लहाणपणीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता सोमा यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

सोमा यांनी नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत सोमा यांनी त्यांच्या व्हायरल झालेल्या त्या फोटो विषयी त्यांना काय वाटले त्या विषयी सांगितले आहे. “मी तो फोटो पाहिला. काही लोकांनी मला तो फोटो शेअर केला होता. तो फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, याची मला कल्पना देखील नव्हती. मी तेव्हा २० वर्षांची होती तेव्हाचा तो माझा फोटो आहे. त्यावेळी माझं वजन ५२ किलो होतं. मनोरंजन सृष्टीत मी माझं नशिब आजमावत होते आणि मला काहीतरी काम मिळेल या विचाराने मी ते फोटो शूट केले होते…मग तो चित्रपट असो किंवा मॉडेलिंग मी करायला तयार होते. पण, मला अभिनय करण्याची इच्छा नव्हती,” असे सोमा म्हणाल्या.

आणखी वाचा : ‘तुला लाज वाटायला हवी, तू मुस्लीम आहेस’, कामाख्या देवीचे दर्शन घेतल्याने सारा झाली ट्रोल

आणखी वाचा : ‘मुस्लीम आहेस तू’, या आधी देखील हिंदू मंदिरात गेल्यामुळे सारा अली खान झाली होती ट्रोल

सोमा या ‘भाभीजी घरपर है’ सोबतच ‘जीजाजी छत पर है’ या लोकप्रिय मालिकेत काम करत आहेत. सोमा या आधी त्यांच्या वजनामुळे चर्चेत आल्या होत्या. त्यांना सोशल मीडियावर बऱ्याच वेळा ट्रोल करण्यात आलं आहे.