कॉमेडियन भारती सिंहने आजवर आपल्य़ा आपल्या विनोदांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. ‘डान्स दीवाने’ शोच्या मंचावर देखील भारती पती हर्ष लिम्बाचियासोबत धमाल करताना पाहायला मिळते. फक्त एखाद्या शोचं होस्टिंग करतानाच नाही तर चाहत्यांसोबत किंवा फोटोग्राफर्ससोबत संवाद साधतानाही भारती अनेकदा मिश्कील अंदाजात उत्तर देत असते. भारतीला नुकतच स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी फोटोग्राफर्सनी भारतीला विचारलेल्या प्रश्नावर तिने मजेशीर उत्तर दिलं आहे.
फोटोग्राफर्सनी भारती सिंहला सेटवर गाठलं. यावेळी भारतीने चाहत्यांना ‘डान्स दिवाने’ आणि कपिल शर्मा शो पाहण्याचं आवाहन केलं. त्यानंतर फोटोग्राफर्सनी भारतीला विचारलं की आम्ही मामा कधी होणार? “बाळाबद्दल काय?” यावर भारतीने मजेशीर उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, “अरे आता तर सर्वांनाच बाळाची प्रतिक्षा आहे. फक्त जरा तुम्ही आम्हाला एकटं सोडा, करतो काही तरी” भारतीच्या या उत्तरानंतर फोटोग्राफर्संना हसू आवरणं कठीण झालं. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
२०१७ सालामध्ये भारती आणि हर्ष विवाहबंधनात अ़डकले आहेत. काही दिवसांपूर्वीच भारती आणि हर्षने ‘डान्स दीवाने’ या शोमध्ये ते बाळासाठी तयारी करत असल्याचा खुलासा केला होता. मात्र करोना माहामारीमुळे त्यांच्यावर मानसिक आघात झाल्याचं ते म्हणाले. एका भावूक परफॉर्मन्सनंतर भारती सिंहला अश्रू अनावर झाले होते. या परफॉर्मन्समध्ये करोनामुळे एका आईने आपल्या १४ दिवसांच्या बाळाला गमावल्याची कथा दाखवण्यात आली होती. हा परफॉर्मन्स पाहून भारती म्हणाली, “आम्ही देखील बाळाचा विचार करत होतो. मात्र अशा काही गोष्टी समोर आल्यानंतर आम्ही कुटुंब वाढवण्याचा विचार बंद केला . आम्ही बाळाच्या विषयावर बोलणंही टाळतो. कारण मला असं रडायचं नाही.” असं भारती म्हणाली होती.