बॉलिवूड अभिनेता अरबाज खान हा गेल्या काही दिवसांपासून ‘इनविजिबल्स विथ अरबाज खान’ या शोमुळे सातत्याने चर्चेत आहे. या कार्यक्रमाद्वारे खान कुटुंबियांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे समोर येताना दिसत आहेत. नुकतंच अरबाज खान याने त्याचे वडील सलीम खान आणि हेलन यांच्या लग्नामुळे त्यांची खरी आई आणि कुटुंबावर कसा परिणाम झाला, याबद्दल सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘इनविजिबल्स विथ अरबाज खान’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात त्याचे वडील आणि लेखक सलीम खान यांनी हजेरी लावली होती. यावेळी सलीम खान यांनी त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले होते. त्यावेळी त्यांनी हेलनशी दुसरे लग्न का केले? याबद्दल खुलासा केला होता. त्यानंतर या शोच्या दुसऱ्या भागात हेलन या पाहुण्या म्हणून दिसल्या. त्यांनीही त्याच्या कारकिर्दीबद्दल आणि विवाहित सलीम खान यांच्याशी लग्न करण्याबद्दलही भाष्य केले.
आणखी वाचा : विवाहित सलीम खान यांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या हेलन, सलमानच्या आईला पाहून लपवायच्या चेहरा अन्…

या कार्यक्रमात हेलन सहभागी झाल्यानंतर त्याने त्याच्या सावत्र आईचे मोकळ्या मनाने स्वागत केले. यादरम्यान दोघांमध्ये सुंदर बाँडिंगही पाहायला मिळाले. यावेळी अरबाजने ‘हेलन’ला आंटी या नावाने हाक मारली. यामुळे सर्वजण चकित झाले होते. यानंतर आता एका मुलाखतीत अरबाजने हेलन आणि त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केले आहे.

अरबाज खानने नुकतंच ‘इंडियन एक्सप्रेस’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याला कुटुंबाबद्दल आणि हेलन यांच्याबरोबरच्या नात्याबद्द्ल विचारण्यात आले. यावेळी तो म्हणाला, “माझे वडील सलीम खान यांना कुटुंबाला एकत्र ठेवण्याचे श्रेय द्यायला पाहिजे. हेलन आंटीबरोबर लग्न केल्यानंतर माझ्या वडिलांना खूप त्रास झाला. त्याबरोबर आमच्या कुटुंबालाही खूप त्रास सहन करावा लागला. या काळात विशेषत: माझी आई सलमा खानने खूप त्रास सहन केला.”

आणखी वाचा : “प्राजू तू गुलाबी गुलाबासारखी…” प्राजक्ता माळीला चाहत्याचा थेट प्रपोज, कमेंट व्हायरल

“तो काळ आमच्यासाठी फार कठीण होता. माझ्या आईलाही फार वेदना सहन कराव्या लागल्या. त्यावेळी आम्ही सर्व फार लहान होतो. पण आमच्या वडिलांनी कधीही आमच्याकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी कोणत्याही गोष्टीपासून आम्हाला वेगळं ठेवलं नाही. हेलनबरोबर लग्न करणे हा एक भावनिक अपघात होता, असे त्यांनी मला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यामुळे त्याच्यासाठी ही काही क्षुल्लक बाब नव्हती.”

“आमच्या वडिलांनी आमचा पूर्णपणे सांभाळ केला. पण माझ्या वडिलांचे दुसरे लग्न स्वीकारणे हे माझ्या आईसाठी फार कठीण होते. त्यावेळी आमच्या पालनपोषणात, सांभाळ करण्यात काहीही फरक पडला नाही. आम्ही त्यावेळीही पूर्वीप्रमाणेच चांगले जीवन जगत होतो. त्यावेळी दोन बायका आणि मुलांचा सांभाळ करणे आणि ती परिस्थिती स्वीकारली जाणे ही सोपी गोष्ट नव्हती. हे कसं घडलं, का घडलं याचं उत्तर देणं कठीण आहे. मला सुरुवातीला हेलन अजिबात आवडायच्या नाहीत. पण आता आमच्या नात्यात सुधारणा झाली आहे. यात माझ्या वडिलांचा फार मोठा वाटा आहे”, असे अरबाज खानने म्हटले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arbaaz khan opened up about his relationship with helen said my mother decided to stand by him nrp