अरबाज खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अरबाज व त्याची दुसरी पत्नी शुरा खान यांनी रविवारी, ५ ऑक्टोबर रोजी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. शुरा खान व अरबाज खान एका गोंडस मुलीचे आई-बाबा झाले. याच दिवशी अरबाज खानची पहिली बायको मलायका अरोराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली.
ज्या दिवशी अरबाज खान आणि शुरा खान यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले, त्याच दिवशी मलायका अरोराने ‘खऱ्या प्रेमा’बद्दल एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. तिने तिच्या आगामी रिअॅलिटी शो ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ मधील एक क्लिप शेअर केली आहे. यात ती, नवजोत सिंग सिद्धू आणि गायक शान हे परीक्षक म्हणून दिसतील.
मलायका अरोराने चाहत्यांना ताण कमी करण्याच्या सोप्या टेक्निक्स सांगितल्या आहेत. व्हिडीओमध्ये, सिद्धू त्यांच्या स्टाईलमध्ये प्रेमावर शायरी करतात. “मैं तुम्हे गॅरंटी देता हूं, की सच्चे प्यार में, सौदेबाजी नहीं होती,” (खऱ्या प्रेमात सौदा नसतो) असं ते म्हणतात. ज्यावर मलायका म्हणाली, “मला लिहायचंय…खऱ्या प्रेमात काय नसतं?” यावर सिद्धू त्यांचं वाक्य पुन्हा रिपीट करतात.
अरबाज खान व शुराचं लग्न
अरबाज खान व शुरा यांनी २४ डिसेंबर २०२३ रोजी लग्न केलं. जवळपास दोन वर्षांनी ५ ऑक्टोबर २०२५ रोजी शुरा आई झाली. अरबाज व शुराच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे. अरबाज, शुरा किंवा खान कुटुंबाने अद्याप लेकीच्या जन्माची अधिकृत घोषणा केली नाही.
अरबाज खान मलायका अरोरा घटस्फोट
मलायका अरोरा व अरबाज खान यांनी १९९८ मध्ये प्रेम विवाह केला होता. त्यांनी मुस्लीम व ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं. २००२ मध्ये त्यांनी मुलगा अरहानचं स्वागत केलं. १८ वर्षांच्या संसारानंतर अरबाज व मलायका २०१६ मध्ये विभक्त झाले. घटस्फोटानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत होती, पण त्यांचं ब्रेकअप झालं.