Neena Gupta First Photo with Granddaughter: ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री नीना गुप्ता आजी झाल्या आहेत. त्यांची एकुलती एक लेक मसाबा गुप्ता आई झाली आहे. नीना गुप्ता यांनी नातीबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. आजी झालेल्या नीना यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसिद्ध अभिनेत्री व फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने शुक्रवारी (११ ऑक्टोबरला) मुलीला जन्म दिला. मसाबा व तिचा पती सत्यदीप मिश्रा आता एका गोंडस लेकीचे आई-बाबा झाले आहेत. मसाबा व सत्यदीप यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली. आता नीना गुप्ता यांनी केलेल्या पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – नीना गुप्ता झाल्या आजी! मसाबा गुप्ताच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन, अभिनेत्रीने बाळाचा पहिला फोटो केला शेअर

नीना गुप्ता यांनी नातीला जवळ घेतलेला एक फोटो शेअर केला आहे. ‘माझ्या मुलीची मुलगी’ असं कॅप्शन देऊन त्यांनी हा फोटो शेअर केला आहे. त्यांच्या या फोटोवर मृणाल ठाकूर, दिया मिर्झा, सुनिता राजवार, दर्शन कुमार, झरीन खान यांनी कमेंट्स केल्या आहेत. नीना गुप्ता यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा – लग्नानंतर तीन वर्षांनी प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, गोंडस लेकीला दिला जन्म, पोस्ट केली शेअर

मसाबा गुप्ता व सत्यदीप मिश्रा यांनी जानेवारी २०२३ मध्ये अगदी साधेपणाने लग्नगाठ बांधली. या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. त्यांच्या लग्नाला दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते. मसाबाचे वडील क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सदेखील या लग्नाला आले होते. या जोडप्याने एप्रिल २०२४ मध्ये इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ते आई-बाबा होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. आता त्यांच्या घरी चिमुकल्या लेकीचं आगमन झालं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neena gupta shares first photo with granddaughter masaba gupta blessed with baby girl softnews hrc