R Madhavan Dubai Home Video: सध्या सगळीकडे दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो व व्हिडीओ पाहायला मिळत आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींच्या दिवाळी सेलिब्रेशनची जोरदार चर्चा आहे. लोकप्रिय बॉलीवूड व दाक्षिणात्य अभिनेता आर माधवनने यंदा दुबईत दिवाळी साजरी केली. त्याच्या दुबईतील घराचा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्या घरी दिवाळीनिमित्त बरेच पाहुणे आले होते, त्यात तमिळ सुपरस्टार अजित कुमारदेखील होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तमिळ अभिनेता अजित कुमार ऐरवी सोशल मीडियापासून दूर असायचा. मात्र अलीकडे त्याचे बरेच फोटो व व्हिडीओ चाहत्यांना पाहायला मिळतात. त्याच्या आगामी ‘गूड बॅड अगली’ सिनेमातील लूकची जोरदार चर्चा आहे. अशातच त्याने माधवनच्या घरी दिवाळी सेलिब्रेशनसाठी हजेरी लावली. या व्हिडीओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने दुबईमध्ये अभिनेता आर माधवनच्या कुटुंबाबरोबर दिवाळी साजरी केली.

हेही वाचा – दोन प्रेमविवाह, दोन्ही वेळा घटस्फोट; आता अभिनेत्रीने खरेदी केलं आलिशान घर, दिवाळीनिमित्त दाखवली घराची झलक

माधवनची पत्नी सरिता बिरजेने इन्स्टाग्रामवर दिवाळी सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात आकर्षक विद्युत रोषणाई, घरातील सजावट, विविध खाद्यपदार्थ दिसत आहे. याच व्हिडीओत त्यांच्या घरी दिवाळीनिमित्त आलेल्या पाहुण्यांचे फोटोही आहेत. अभिनेता अजितदेखील या व्हिडीओत दिसत आहे. तो कार रेसिंग स्पर्धेसाठी दुबईत आहे.

हेही वाचा – बाबा अन् भावाला गमावलं, प्रचंड संघर्षानंतर अभिनेत्रीने २८ व्या वर्षी मुंबईत घेतलं हक्काचं घर, आईसह पूजा करताना झाली भावुक

सरिता बिरजे ही मराठी आहे. या व्हिडीओत सरिता पारंपरिक मराठी लूकमध्ये दिसत आहे. तिने पैठणी नेसली असून नाकात नथ घातली आहे. तिने व माधवनने दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन केले. तसेच आलेल्या पाहुण्यांसाठी विविध खाद्यपदार्थांची मेजवानीही व्हिडीओत पाहायला मिळते. सरिताने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर आतून कसं दिसतं? पाहा ५३ व्या मजल्यावरील अपार्टमेंटचा Inside Video

शिल्पा शेट्टीने या व्हिडीओवर कमेंट केली आहे. तसेच अनेकांनी माधवन व सरिता यांनी दिवाळीनिमित्तर घर छान सजवलंय अशा कमेंट्स केल्या आहेत. काही चाहत्यांना माधवन व सरिताचं हे दुबईतील घर फारच आवडलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R madhavan dubai home video actor wife sarita birje marathi look ajith kumar attended diwali pooja at maddy house hrc