scorecardresearch

आर माधवन

आर. माधवन


आर. माधवन (R Madhavan) हा भारतीय चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक आहे. तो अभिनयासह लेखन, दिग्दर्शन देखील करतो. नुकतीच त्याने निर्मिती क्षेत्रामध्येही पदार्पण केले आहे. आर. माधवनचे संपूर्ण नाव रंगनाथन माधवन असे आहे. त्याचा जन्म १ जून १९७० रोजी बिहारमधील जमशेदपूर या ठिकाणी एका तमिळ ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला. त्याचे वडील टाटा स्टीलमध्ये मोठ्या पदावर कामाला होते. वडिलांच्या नोकरीमुळे माधवनचे कुटुंब जमशेदपूर येथे स्थित होते. माधवनची आई तेथील बॅंकेमध्ये मॅनेजर होत्या. एकूणच माधवनच्या घरामध्ये शैक्षणिक वातावरण होते. याचा परिणाम त्याच्या जीवनावर झाला.


जमशेदपूरमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने विज्ञान शाखेमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी कोल्हापूर गाठले. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर माधवनने शिष्यवृत्ती मिळवली आणि त्याला कॅनडामध्ये जाऊन भारताचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली. शिष्यवृत्तीचा कालावधी पूर्ण झाल्यावर माधवन भारतात परतला. पुढे विज्ञान शाखेच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयामध्ये पदवी मिळवली. त्याच सुमारास त्याने एनसीसीमध्ये भाग घेतला. पुढे ब्रिटीश सैन्याच्या प्रशिक्षण प्रभागामध्ये सहभागी होण्याची संधी त्याला मिळाली. मात्र वयाच्या अटीमुळे त्याला प्रशिक्षण घेता आले नाही. कोल्हापूरमध्ये असताना माधवनने व्यक्तिमत्व विकासाचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. पदव्युत्तर शिक्षणासाठी तो मुंबईला आला.


मुंबईमध्ये आल्यावर माधवनला मॉडेलिंग करण्याचा सल्ला देण्यात आला. त्याने स्वत:चा पोर्टफोलिओ तयार केला. १९९३-९४ मध्ये मॉडेलिंग करण्यासह त्याने अभिनयाची कारकीर्द देखील सुरु झाली. सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये तो अनेक मालिकांमध्ये झळकला. मालिकांसह माधवन जाहिरातींमध्येही काम करत होता. त्याला हिंदी, मराठी, तमिळ, इंग्रजीसह दक्षिण भारतातील अन्य भाषेचे ज्ञान होते. याचा फायदा त्याला अभिनय क्षेत्रामध्ये झाला. एकाच वेळी तो अनेक भाषांमध्ये काम करु लागला. एका जाहिरातीमध्ये काम करताना माधवनचे काम दिग्दर्शक संतोष शिवन यांना प्रचंड आवडले. संतोष यांनी त्याची शिफारस मणी रत्नम यांच्याकडे केली. तेव्हा मणी सर ‘इरुवर’ (Iruvar) हा चित्रपट बनवत होते. चित्रपटातील मुख्य पात्रासाठी माधवनने ऑडिशन दिली. पण पात्रांच्या तुलनेमध्ये तो अधिक तरुण दिसत असल्याने ती भूमिका मोहनलाल यांच्याकडे गेली.


‘इरुवर’ १९९७ मध्ये प्रदर्शित झाला. पुढे लगेच १९९८ मध्ये माधवनने ‘शांती शांती शांती’ या कन्नड चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘इरुवर’च्या वेळी हुकलेली संधी माधवनला ‘आलापयुथेय’च्या (Alaipayuthey) रुपात मिळाली. आर.माधवन आणि शालिनी या फ्रेश जोडीला घेऊन मणी रत्नम यांनी तयार केलेला हा तमिळ चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटामुळे माधवनला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. पुढे तो मणी सरांच्या अनेक चित्रपटांमध्ये झळकला. २००१ मध्ये त्याचा ‘मिनाले’ (Minnale) आला. या चित्रपटामुळे दक्षिण भारतात त्यांची प्रतिमा रोमॅन्टिक हिरो अशी बनली. त्याच वर्षी मिनालेचा हिंदी रिमेक ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. यातला ‘मॅडी’ तरुणाईला भावला. आता माधवनचे चाहते दक्षिण भारतासह उत्तर भारतामध्येही तयार झाले.


आर. माधवनने आत्तापर्यंत ‘कन्नाथिल मुथामित्तल’ (Kannathil Muthamittal), ‘रन’, ‘जय जय’, ‘एथिरी’ (Aethirree), ‘विक्रम वेधा’ अशा अनेक सुपरहिट दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमध्ये तो रंग दे बसंती, ३ इंडियट्स, गुरु अशा चित्रपटांमध्ये झळकला आहे. तनू वेड्स मनू, तनू वेड्स मनू रिटर्न्स यांसारखे त्यांचे चित्रपटही हिट ठरले आहेत. माधवनचा सर्वात महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट. इस्त्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटामध्ये माधवनने प्रमुख पात्र साकारण्याबरोबरच लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम केले.


Read More
R Madhavan on Aditya Dhar peak detailing in Dhurandhar movie budget extra 10 crore.
सोशल मीडियावर गाजलं धुरंधरचं ‘पीक डिटेलिंग’; पण यासाठी आदित्य धरने किती कोटी केला होता खर्च? आकडा वाचून व्हाल थक्क

Peak Detailing by Aditya Dhar : ‘धुरंधर’ सिनेमातील बारकाव्यांसाठी जास्त खर्च केल्याचे आर. माधवनने सांगितले.

r-madhavan-run-movie-action-scene-career-turning-point-mani-ratnam
“ते माझ्याकडे वेगळ्याच नजरेने…”, आर माधवनने ‘या’ दिग्गजाबद्दल केला मोठा खुलासा

R Madhavan Run Movie Turning Point: २००२ मध्ये आलेल्या ‘रन’ चित्रपटाने अभिनेता आर. माधवनच्या करिअरला भलताच टर्न दिला. आधी फक्त…

R Madhavan politics entry discussion | Actor R Madhavan with actor Vijay | आर माधवन राजकारण प्रवेश चर्चा | आर माधवन आणि अभिनेता विजय
अभिनेता आर. माधवन राजकारणात येणार? म्हणाला, “मी मुख्यमंत्री विजयला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो…”, उदयनिधींवरही भाष्य

अभिनेता आर. माधवन राजकारणात प्रवेश करणार का? या चर्चांवर स्वतः आर. माधवनने उत्तर दिलं आहे. आगामी ‘GDN’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान…

r-madhavan-dhurandhar-propaganda-troll-response-gdn-movie
आर. माधवन सरकारची बाजू घेतो? ‘धुरंधर’वरील प्रोपगंडाच्या आरोपांवर अभिनेत्याचं उत्तर, म्हणाला, “नेत्यांविरोधात काहीही…”

R Madhavan Dhurandhar Propaganda : धुरंधर सिनेमावर होणाऱ्या ट्रोलिंगवर आर. माधवनचे उत्तर. काय म्हणाला अभिनेता? वाचा सविस्तर.

Raj Thackeray speech on PM Modi and Dubai celebrities | Vivek Oberoi R Madhavan Dubai controversy statement by Raj Thackeray
पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवणारे आर. माधवन, विवेक ओबेरॉय दुबईत का राहतात? राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackeray speech on PM Modi: पंतप्रधान मोदींवर ज्यांनी विश्वास दाखवला, सरकार प्रायोजित चित्रपटांतून पैसे कमावले ते दुबईत का स्थायिक…

r-madhavan-shares-ias-pratap-murugan-rainwater-harvesting-story
कोरड्या बोअरवेल्सचा असाही वापर, IAS अधिकाऱ्याने शक्कल लढवली अन् भूगर्भातील पाणी पातळी वाढली; आर. माधवनने केलं कौतुक

R Madhavan Shares IAS Story: अभिनेते आर. माधवन यांनी तमिळनाडूमधील आयएएस अधिकारी प्रताप मुरुगन यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. मुरुगन…

MomsMade Thekua business Marathi success story | R Madhavan praise MomsMade startup valuation | मॉम्समेड ठेकुआ व्यवसाय यशोगाथा | आर माधवन मॉम्समेड ठेकुआ इन्स्टाग्राम स्टोरी
घरच्या ४ शेगड्यांवरून माय-लेकाच्या जोडीने उभारला ७५ कोटींचा ब्रँड! अभिनेता आर. माधवनही झाला फॅन

MomsMade Thekua Business : घरातील किचनमधून सुरू केलेल्या ‘ठेकुआ’ व्यवसायाचे आज ७५ कोटी रुपयांच्या ‘मॉम्समेड’ ब्रँडमध्ये रूपांतर झाले आहे.

r-madhavan-son-vedaant-parenting-tips
“माझा मुलगा वॉचमनला…”, कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक असूनही आर माधवनने मुलाला दिलेत असे संस्कार, वाचून कराल कौतुक फ्रीमियम स्टोरी

R Madhavan parenting tips and son Vedaant values. आर माधवन आणि सरिता बिर्जे यांचा २१ वर्षांचा मुलगा वेदांत माधवन हा…

actor R Madhavan wearing a luxury 40 lakh watch at Padma Shri award ceremony
आर माधवनने पद्म पुरस्कार सोहळ्यात घातलं सोन्याचं घड्याळ, किंमत तब्बल…; जगभरात फक्त १० जणांकडे आहे हे लक्झरी घड्याळ

R Madhavan Luxury Titan watch : आर. माधवनने पद्म पुरस्कार स्वीकारताना महागडे घड्याळ परिधान केले होते. काय आहेत या घड्याळाची…

padma-awards-alka-yagnik-mammootty-r-madhavan-pm-modi-loksatta
अल्का याज्ञिक, मामूटी, आर माधवनसह ‘या’ कलाकारांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित, वाचा पद्म पुरस्कार विजेत्यांची यादी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आशीर्वाद घेत आर माधवन आणि अलका याज्ञिक यांनी स्वीकारला पद्म सन्मान; राष्ट्रपती भवनातील व्हिडिओ व्हायरल

r-madhavan-son-vedaant-madhavan-swimming-career-dubai-shift-parents-support
आर. माधवनने मुलाच्या करिअरसाठी सोडला देश; दुबईला जाताच वेदांतला बसलेला मोठा धक्का, म्हणाला, “सगळं खूप…”

R Madhavan Son Vedaant Madhavan Dubai Life: अभिनेता आर. माधवन आणि सरिता बिर्जे यांचा मुलगा वेदांतने जलतरणपटू म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर…

Madhavan on why he never cheated on wife Sarita
“सुंदर मुली आकर्षित करतात”, आर. माधवनने मराठमोळ्या पत्नीची फसवणूक का केली नाही? म्हणाला…

R Madhavan and wife Sarita Birje 27th wedding anniversary recently: आर. माधवन आणि त्याची मराठमोळी पत्नी सरिता बिरजे यांच्या लग्नाला…

संबंधित बातम्या