बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची सध्या सातत्याने चर्चा सुरु आहे. आज मंगळवारी ७ फेब्रुवारीला कियारा आणि सिद्धार्थ विवाहबंधनात अडकणार आहेत. त्या दोघांच्या लग्नापूर्वीच्या सभारंभाचे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. सिद्धार्थ आणि कियाराने लग्नासाठी राजस्थानमधील जैसलमेर ही जागा निवडली आहे. या लग्नासाठी साधारण किती खर्च आला असेल? याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ आणि कियारा हे डेस्टिनेशन वेडींग करणार असून त्यासाठी त्यांनी राजस्थानमधील जैसलमेर ही जागा निवडली आहे. राजस्थान जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेस ते दोघेही विवाहबद्ध होणार आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे कियारा-सिद्धार्थच्या लग्नासाठी उपस्थित आहेत. सिद्धार्थ-कियाराच्या हळदी आणि संगीत सोहळ्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी या पॅलेसला आकर्षक रोषणाई, सजावट करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे.
आणखी वाचा : Sid-Kiara Wedding : ‘या’ अभिनेत्रीच्या सल्ल्यानंतर सिद्धार्थ आणि कियाराने लग्नासाठी निवडलं राजस्थान

राजस्थानच्या जैसलमेर या ठिकाणी असलेल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सिद्धार्थ-कियारा विवाहबद्ध होणार आहेत. राजस्थानमधील सूर्यगढ पॅलेस हा जैसलमेर शहरापासून १६ किलोमीटर दूर आहे. हा पॅलेस ६५ एकर परिसरात पसरलेला आहे. हा पॅलेस भारतातल्या टॉप १५ वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक म्हणून ओळखला जातो.

या पॅलेसमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी त्यांच्याकडून आकारण्यात येणारं भाडंही तितकंच मोठं आहे. जर एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी लग्न करण्याचं असल्यास १ कोटी २० लाख रुपये भाडे आकारले जाते. तर ऑक्टोबर ते मार्च महिन्यादरम्यान हा आकडा २ कोटींपर्यंत जातो. या पॅलेसमध्ये २५० स्क्वेअर फूट रुममध्ये एक दिवस राहण्यासाठी २० ते ३० हजार रुपये भाडं आकारण्यात येतं. तर या हॉटेलमधील लक्झरी रूम्ससाठी एका दिवसाला ४० ते ५० हजार भाडं आकारलं जातं.

आणखी वाचा : Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding : ८४ खोल्या, ९२ बेडरुम, व्हिला, पूल अन्…; सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नासाठी एका दिवसाचे भाडे किती? 

यानुसार सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नात तीन दिवसांसाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाचे ठिकाण असलेल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये पाहुण्यांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांचे लग्न आज पार पडणार असून संध्याकाळी यांनी रिसेप्शन सोहळा आयोजित केला आहे. सूर्यगढ पॅलेसमध्येच हा रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidharth malhotra kiara advani 3 day wedding in jaisalmer to cost 6 crore said reports nrp