Sunjay Kapur assets case : दिवंगत व्यावसायिक संजय कपूर यांच्या कुटुंबाचा कलह वाढत चालल्याचं दिसून येतं आहे. ३० हजार कोटींच्या संपत्तीची वाटणी आता वादाचा उंबरठा ओलांडूनही पुडे गेली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात संजय कपूर यांची पत्नी प्रिया सचदेव कपूरने काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर करिश्मा कपूरच्या (संजय कपूर यांची घटस्फोटित पत्नी) मुलांनीही गंभीर आरोप केला आहे.
प्रिया सचदेव यांनी काय म्हटलं आहे?
माझे पती संजय कपूर यांच्या संपत्तीबाबत कुठलाही खुलासा करण्यात येऊ नये. ही प्रिया सचदेव यांची प्रमुख मागणी आहे. दुसरीकडे संजय कपूर यांची घटस्फोटित पत्नी करीश्मा कपूरच्या वकिलांचा दावा चकित करणारा आहे. करिश्मा कपूर आणि तिच्या मुलांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितलं आहे की दिवंगत व्यावसायिक संजय कपूर यांच्या मृत्यूपत्रात ज्या पैशांचा उल्लेख करण्यात आला होता ते पैसे बँकेच्या खात्यातून गायब झाले आहेत. सद्यस्थितीत अकाऊंट रिकामं आहे.
प्रिया सचदेव यांचं म्हणणं काय?
न्यायाधीश ज्योती सिंह यांनी प्रिया सचदेव यांना विचारलं आहे की संजय कपूर यांच्या संपत्तीची माहिती आम्ही बंद लिफाफ्यात किती काळ ठेवणार? प्रिया सचदेव यांच्या वकिलांना त्यांनी विचारलं की मी असे आदेश कसे काय देणार? त्यासाठी मला तुम्ही अशा प्रकरणांची उदाहरणं दाखवा. संपत्तीचे तपशील गोपनीय ठेवण्यात काय हशील आहे? यानंतर प्रिया सचदेव यांच्या वतीने वकील म्हणाले की माझ्या अशीलांना गोपनीय काहीही ठेवायचं नाही. मात्र करिश्मा कपूर यांनी नॉन डिस्क्लोजर करारावर (NDA) सही करावी अशी त्यांची इच्छा आहे. असं प्रिया सचदेव यांच्या वकिलांनी न्यायाधीशांना सांगितलं.
दिल्ली उच्च न्यायालयात निवदेन
प्रिया सचदेव या संजय कपूर यांच्या तिसऱ्या पत्नी आहेत. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एकन निवेदन दिलं आहे. यामध्ये त्यांनी संजय कपूर यांच्या संपत्तीचं विवरण बंद लिफाफ्यात ठेवलं जावं, त्याचा खुलासा करु नये अशी मागणी केली आहे. तसंच यासंदर्भात नॉन डिस्क्लोजर अॅग्रीमेंटही तयार करण्यात यावं असं म्हटलं आहे. करीश्मा कपूर ही संजय कपूर यांची दुसरी पत्नी आहे. संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांना दोन मुलं आहेत. या दोघांचा घटस्फोट झाला आहे.
संजय कपूर यांच्या संपत्तीचा वाद काय?
उद्योगपती संजय कपूरची तिसरी प्रिया सचदेव आणि त्यांची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्यात ३० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेसंदर्भात वाद सुरू आहे. करिश्माच्या मुलांनी प्रियावर बनावट मृत्युपत्र तयार करून त्यांना वारसा हक्कातून वगळल्याचा आरोप केला आहे. २००३ मध्ये संजय कपूर व करिश्मा कपूरचे लग्न झाले होते. ते २०१६ पर्यंत एकत्र होते. त्यांना समायरा व कियान ही दोन अपत्ये आहेत. करिश्माशी घटस्फोट झाल्यानंतर २०१७ मध्ये संजयने प्रिया सचदेवशी लग्न केले. संजय याचं जून २०२५ मध्ये लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. संजय कपूर यांची मालमत्ता ३० हजार कोटी रुपये आहे.