सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला जवळपास तीन वर्षे झाली आहेत. १४ जून २०२० रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या मुंबईतील घरातील बेडरूममध्ये सापडला. सुशांतच्या मृत्यूनंतर मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला. आजही अनेक कलाकारांना सुशांतची आठवण येते. नुकतचं बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांनी सुशांतची आठवण काढत एक किस्सा सांगितला आहे. लॉकडाऊनपूर्वी सुशांतने मनोज बाजपेयींना फोन करत एका गोष्टीची मागणी केली होती.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
हेही वाचा- वहिनी असावी तर अशी! सनी कौशलच्या वाढदिवशी कतरीनाने दिलं होत मोठं गिफ्ट; खुद्द अभिनेत्याने सांगितला ‘तो’ किस्सा
‘द बॉम्बे जर्नी’ला दिलेल्या मुलाखतीत मनोज बाजपेयी म्हणतात की सुशांत ज्या मार्गाने गेला तो केवळ त्याच्या कुटंबासाठी तर त्याला जवळून ओळखणाऱ्या सर्वांसाठी धक्कादायक होते. सुशांतने मला लॉकडाऊनच्या अगदी आधी शेवटचा मेसेज केला होता आणि त्यांच्या घरी येऊन मटण खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, सुशांतच्या आत्महत्येच्या बातमी वाचून विश्वासच बसला नाही. त्याच्या मृत्यूनंतर मला २ महिने त्रास झाला.
हेही वाचा- “अँजिओप्लास्टी केल्यानंतर एका महिन्याने…” हृदयविकाराचा झटका आलेल्या सुश्मिता सेनने शेअर केली पोस्ट
मनोज बाजपेयी आणि सुशांत सिंग राजपूत यांनी २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘सोनचिरिया’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्या काळात मनोज चित्रपटाच्या सेटवर आपल्या सहकलाकारांसाठी घरी शिजवलेले मटण आणत असे. मनोज बाजपेयी मुलाखतीत म्हणतात, ‘सुशांत हा खूप गोड होता. मी त्याच्यासोबत बरेच चांगले दिवस घालवले. तो माझ्याशी अनेक गोष्टींवर चर्चा करत असे. मी जेव्हा करोनाच्या आधी उत्तराखंडमध्ये माझ्या शूटसाठी निघालो तेव्हा त्याने मला मेसेज पाठवला की, मनोज सर, मला तुमच्या घरी बोलवून एकदा मटण खाऊ घालण्याची मागणी केली होती. मी त्याला हो म्हणालो. शूटवरून परत येताच त्याला मटण खायला घालायचे असे ठरले. मात्र, त्यापूर्वीच सुशांतने आत्महत्या केल्याची बातमी आली आणि संपूर्ण मनोरंजन सृष्टी हादरून गेली.