करण जोहरचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’ अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हा चित्रपट क्लासिक मानला जातो. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी यशवर्धन रायचंद ही भूमिका केली होती, तर जया बच्चन त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत होत्या. या चित्रपटातील भूमिकेत बिग बी इतके शिरले होते की ते घरात पत्नी व मुलांशीही त्या पात्राप्रमाणे वागले होते, असा खुलासा दिग्दर्शक निखिल अडवाणीने केला आहे.

‘रेडिफ’ ला दिलेल्या मुलाखतीत निखिलने चित्रपटातील मध्यंतरापूर्वीच्या एका सीनची आठवण सांगितली. जिथे रायचंद आपला दत्तक मुलगा राहुलला (शाहरुख खान) अंजलीशी (काजोल) लग्न करण्यासाठी घराबाहेर हाकलतात. कॅमेरामन किरण देवहंस यांनी अमिताभ बच्चन यांना पुढे उभं राहण्यास सांगितलं तर राहुल आणि अंजली दारात दूर उभे होते. “आज तू सिद्ध केलं की तू माझा रक्ताचा मुलगा नाहीस” असा डायलॉग इथे अमिताभ यांना म्हणायचा होता.

Video: पाच वर्षांपूर्वी मोडलं पहिलं लग्न, प्रसिद्ध अभिनेत्याने ९ वर्षांनी लहान अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ व्हायरल

निखिलने शेड्यूलमध्ये चूक झाल्याचं कबूल केलं. तो सीन तीन दिवसांचा होता, पण निखिलने अमिताभ यांना दोन दिवसात सीन शूट करणार असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, “नंतर मी त्यांची माफी मागितली तेव्हा आईसमान असलेल्या जयाजींनी मला फटकारलं आणि म्हटलं की मी काय केलं आहे याची मला कल्पना नाही. ‘गेल्या दोन दिवसांपासून ते माझ्याशी किंवा मुलांशी बोलत नाहीये, नुसते फिरत आहेत आणि सगळ्यांवर चिडत आहेत.’ त्यावर मी ‘का?’ असं आश्चर्याने विचारलं. मग त्यांनी सांगितलं ते या भूमिकेत शिरले आहेत. ‘पण त्यांना फक्त एकच डायलॉग बोलायचा आहे’ असं मी म्हणालो.

श्वेता बच्चन आई-वडिलांसह मुंबईत का राहते? पतीबरोबर न राहण्याचं कारण काय? जाणून घ्या

निखिलने सांगितलं की अमिताभ बच्चन वैयक्तिक आयुष्यात असे नाहीत, त्यामुळे हा सीन करणं त्यांच्यासाठी कठीण होतं. आपल्या दत्तक मुलाला मिठाईवाल्याच्या मुलीशी लग्न करत असल्याने घरातून बाहेर काढणं चुकीचं आहे हे रायचंद यांना माहित होतं. बिग बींनी हा सीन दोन दिवसात शूट केला होता. हा सीन शूट करताना ते जागेवरून हलले नव्हते, असं निखिल म्हणाला.