Anup Soni in Congress Advertisement : क्राइम पेट्रोल या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अनुप सोनी यांची एक व्हिडिओ क्लिप काँग्रेसच्या जाहिरातीत दिसल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय त्यांचा हा व्हिडिओ वापरण्यात आल्याने त्यांच्या चाहत्यांसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, अनुप सोनी यांनीही एक्स माध्यमावरून या जाहिरातीवर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसच्या अधिकृत एक्स खात्यावरून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसने अरविंद केजरीवालांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यात म्हटले आहे, “दिल्ली की जनता, सावधान. 10 साल से ये आदमी दिल्ली की जनता को ठग रहा है. गरीब देश को बदल बनाकर खुद शीशमहल में मौज उडा रहा है. इसको इस्स बार सबक सिखाना है. इस बार दरवाजा नाही खोलना है.” त्यानंतर व्हिडिओ क्राईम पेट्रोलमधील अनुप सोनी म्हणतो, “ऐसे हाल में बेहातर ये हैं की वक्त रहते इंसान सतर्क होकर अपने कदम पहले हाथ ले.”

हीच जाहिरात पुन्हा शेअर करत अनुप सोनी म्हणाले, “माझ्या दूरदर्शनवरील कामाचा एक छोटासा भाग या राजकीय प्रचाराच्या व्हिडिओमध्ये वापरण्यात आला आहे. माझा याच्याशी काहीही संबंध नाही.”

अनुप सोनी यांनी सी हॉक्स आणि साया यांसारख्या टेलिव्हिजन मालिकांमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी टेलिव्हिजनमधून ब्रेक घेतला. ते २००३ मध्ये खरशीं: स्कार्स फ्रॉम दंगल, हम प्यार तुम्ही से कर बैठे तसेच हाथयार या चित्रपटांमध्ये काम केले. २००४ मध्ये अशोक पंडित यांच्या शीन या चित्रपटातही त्यांनी काम केलंय.सीआयडी: स्पेशल ब्युरोमध्ये काम करण्यासाठी ते दूरदर्शनवर परतले. ते क्राईम पेट्रोल होस्ट करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime petrol fame actor anup soni seen in congress advertisement sgk