‘डान्स इंडिया डान्स’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो पैकी एक आहे. ‘डान्स इंडिया डान्स ४’च्या पर्वाचा स्पर्धक बिकी दासचा शुक्रवारी रात्री अपघात झाला आहे. ‘डान्स इंडिया डान्स ४’च्या उत्कृष्ट डार्न्सपैकी बिकी एक होता. डान्समध्ये करिअर झाले नाही म्हणून बिकी फूड डीलिव्हरी बॉयचं कोलकातामध्ये काम करत होता.
एका वृत्तानुसार, बिकी स्वत: च्या दुचाकीवरून जात असताना त्याला एका दुचाकीने धडक दिली. बिकीचा अपघात झाल्यानंतर त्याच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आणखी वाचा : आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य
बिकी २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डान्स इंडिया डान्स ४’मध्ये स्पर्धक म्हणून होता. या पर्वात श्याम यादव हा विजेता होता तर बिकी दास हा सेकेन्ड रनरप होता. बिकी वेगवेगळ्या ठिकाणी पर्फोमन्स करायचा आणि डान्स कोरिओग्राफर म्हणून काम करत होता. मात्र, करोना काळात काम नसल्याने त्याने गेल्या आठवड्यापासून फूड डीलिव्हरचं काम करायला सुरूवात केली होती.