अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून कायम पसंत केलं जात. पडद्यावर दिसणारी त्यांची केमिस्ट्री खऱ्या आयुष्यातही तितकीच घट्ट आहे. दोघांना अनेकदा एकत्र धमाल करताना पाहायला मिळत.

रणवीर आणि दीपिका दोघही सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टीव आहेत. कधी रणवीर मजेशीर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करुन चाहत्यांचं मनोरंजन करतो तर कधी दीपिका धमाल व्हिडीओ पोस्ट करत चाहत्याचं लक्ष वेधून घेताना दिसते.
नुकताच दीपिकाने पती रणवीरसोबतचा एक भन्नाट व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. दोघांचाही हा धमाल डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

दीपिकाने पोस्ट केलेल्या व्हिडीओत दोघ बोल्ड डान्स करत मजा मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या सुरुवातील कलफूल नाईट सूट आणि डोक्यावर हॅट घातलेली दीपिका डान्स मूव्हस् करताना दिसते. नंतर रणवीरही तिच्यासोबत डान्स करु लागतो. रणवीरने देखील दीपिकाप्रमाणेच लाल रंगाची टेडी बिअरचं चित्र असलेली पॅण्ट, जॅकेट आणि हॅट घातली आहे. रणवीर सिंह मजेशीर अंदाजात बोल्ड डान्स करताना या व्हिडीओत दिसतोय. तर रणवीर नातच असतानाच दीपिका त्याला धक्का देते आणि खाली पाडून स्वत: नाचू लागते. यावेळी रणवीरच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे आहेत. त्यानंर दोघेही वेड्यासारखे नाचत असल्याचं या व्हिडीओत दिसतंय. दीपिकाने या व्हिडीओला Werk it baby! असं कॅप्शन दिलं आहे. तर ‘बुसीट चॅलेंज’चा हॅशटॅग तिने या व्हिडीओला दिलाय.

दीपिका आणि रणवीरच्या या भन्नाट डान्सला सोशल मीडिया मोठी पसंती मिळतेय. या व्हिडीओला काही तासातच 11 लाखांहून अधिक लाईकस् मिळाले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी दोघांना हटके कमेंट केल्या आहेत. बिपाशा बासूने ‘क्यूटीस्’ अशी कमेंट दिली आहे. अनेक चाहत्यांनी देखील या व्हिडीओला कमेंट केल्या आहेत. नीना गुप्ता यांची मुलगी आणि प्रसिद्ध पॅशन डिझायनर मसाबा गुप्ताने डिझाइन केलेले कपडे या दोघांनी घातले आहेत. याच कपड्यांच्या एका व्हिडीओ जाहिरातीसाठी दीपिका आणि रणवीरने ही धमाल उघवून दिलीय.

2018 मध्ये दीपिका आणि रणवीरने लग्नगाठ बांधली. लव्हबर्ड म्हणून सोशल मीडियावर दोघांची कायम चर्चा असते. लवकरच दोघाची जोडी ’83’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 1983 सालात भारताने जिंकलेल्या विश्वचषकाचा थरार या सिनेमात पाहायला मिळणार असून रणवीर या विश्वचषकाचे कप्तान कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.