हॉलीवूडमध्ये एन्ट्री होता होता थांबलेली दीपिका पदुकोण आता हॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. विन डिझेलसोबत ती झळकणार असून, त्याची हलकीशी झलक तिने चाहत्यांना फेसबुकद्वारे दिली आहे.
फेसबुकवर दीपिकाने प्रदर्शित केलेल्या फोटोत विन डिझेल पाठमोरा उभा असून, त्याला दीपिकाने मिठी मारलेली दिसते. त्यांच्यामागे ‘XXX’ या चित्रपटाचा लोगो दिसतो. याआधी दीपिका ‘फास्ट अॅण्ड फ्युरिअस ७’ या चित्रपटात काम करणार होती. मात्र, तिच्या बॉलीवूड चित्रपटांमुळे तिने यात काम करणे टाळले होते. मात्र, आता ‘XXX’ या चित्रपटाच्या सिरीजमध्ये झळकेल. दीपिकासह विननेदेखील दीपिका सोबतचा फोटो प्रदर्शित केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Dec 2015 रोजी प्रकाशित
विन डिझेलसोबत झळकणार दीपिका पदुकोण
फेसबुकवर दीपिकाने प्रदर्शित केलेल्या फोटोत विन डिझेल पाठमोरा उभा दिसतो.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 07-12-2015 at 14:16 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukone meets vin diesel might work with him in the next xxx film