छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘देवमाणूस’ला ओळखले जाते. ‘देवमाणूस’ या मालिकेने ऑगस्ट २०२१ ला प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर काही महिन्यातच सुरु झालेल्या या मालिकेच्या दुसऱ्या पर्वानेही प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. देवमाणूस या मालिकेला पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. आता ही मालिका एका विलक्षण वळणावर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत विविध ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवमाणूस २ या मालिकेत नुकतंच एका नवीन व्यक्तिरेखेची एंट्री झाली आहे. इन्स्पेक्टर मार्तंड जामकर असे या पात्राचे नाव आहे. देवमाणूस या मालिकेत अजितकुमारला कोणाचाही धाक नाही, असं वाटत असतानाच आता इन्स्पेक्टर मार्तंड जामकर यांची मालिकेत एंट्री झाली. त्यानंतर मालिकेत एक रंजक वळण आल्याचे पाहायला मिळत आहे. याच इन्स्पेक्टर मार्तंड जामकरमुळे अजितकुमार देव अडचणीत सापडणार आहे.

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतून एक्झिट घेण्याबाबत उर्मिला कोठारेचे स्पष्टीकरण, म्हणाली “एका महिन्यानंतर…”

देवमाणूस या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. जामकर आणि देवयानीच्या एंट्री नंतर हि मालिका विलक्षण वळणावर आली आहे. जामकरने अजितकुमारला पुरता अडकवल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात अडकण्याचा निश्चय जामकरने केला आहे. त्यासाठी लागणार सर्व तपास जामकर करत आहे.

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपट पाहिल्यानंतर अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया, म्हणाले “या चित्रपटातील…”

इन्स्पेक्टर जामकरने नाम्याला अटक केल्यामुळे सगळे टेन्शनमध्ये आहेत. त्यासाठी गावकरी मोर्चा काढायची तयारी करतात. पण जामकर येऊन त्यांचा सगळा प्लॅन फ्लॉप करतो. जामकरच्या हाताला अजितकुमारच्या विरोधात एक जबरदस्त पुरावा लागला आहे. अजितने निलमचा मर्डर केल्याच्या त्या हॉटेलचे फूटेज मिळते. जामकारच्या जाळ्यातून सुटण्यासाठी अजित डिंपलला देवयानीची मदत घ्यायला सांगतो. देवयानी अजितकुमारची मदत करणार का? अजितकुमार जामकारच्या जाळ्यातून सुटणार का? या सर्वांची उत्तरे प्रेक्षकांना येत्या भागात पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devmanus 2 marathi serial update dr ajit kumar dev will be in trouble due to inspector martand jamkar nrp