Dhanashree Verma Talk About Yuzvendra Chahal : क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची एक्स पत्नी तसंच कोरिओग्राफर धनश्री वर्मा या दोघांच्या नात्याबद्दल कायमच चर्चा होताना दिसतात. युजवेंद्र व धनश्री वर्मा यांचा ४ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर यावर्षी घटस्फोट झाला. मात्र या घटस्फोटानंतरही त्यांचं नातं अनेकदा चर्चेत येत असतं. धनश्री सध्या ‘Rise And Fall’ या शोमध्ये सहभागी झाली आहे. या शोमधून ती चहलबरोबरच्या नात्याबद्दल व्यक्त होत आहे.

या शोमध्ये धनश्रीने आपल्या लग्नाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने युजवेंद्रचं नाव न घेता सांगितलं की, तिची नात्यात फसवणूक झाली होती. नुकत्याच झालेल्या भागात धनश्री तिची सहस्पर्धक कुब्ब्रा सैत हिच्याशी नाश्ता करताना गप्पा मारत होती. या संभाषणादरम्यान, कुब्ब्राने धनश्रीला तिच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला. ज्याचं उत्तर देताना धनश्रीने फसवणूक झाल्याचं म्हटलं आहे.

धनश्री आणि कुब्ब्रा यांच्या संभाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात कुब्ब्रा धनश्रीला विचारते, ‘तुला कधी वाटलं की, हे नातं आता चालणार नाही’, त्यावर धनश्री उत्तर देत म्हणते, “पहिल्या वर्षातच… दुसऱ्या महिन्यातच मी त्याला पकडलं.” हे उत्तर ऐकून कुब्ब्रा चकीत होते. त्यानंतर कुब्ब्रा तिला सल्ला देते की, “तू तुझा वेळ घे. तुला जेव्हा त्याबद्दल बोलावंसं वाटेल, तेव्हाच तू बोल.”

याच शोमध्ये धनश्रीने पोटगीबाबतही स्पष्टीकरण दिलं होतं. तिने युजवेंद्रकडून कोणतीही पोटगी मागितली नव्हती, असं स्पष्टपणे म्हटलं. तसंच पोटगीसंदर्भात समोर आलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचंही ती म्हणाली. आदित्य नारायणने तिला विचारलं की, ‘घटस्फोटाला किती वेळ लागला?’ तेव्हा धनश्री म्हणाली, “सगळं खूप लवकर झालं. कारण आम्हा दोघांना घटस्फोट हवा होता. त्यामुळे जेव्हा लोक पोटगीबद्दल बोलतात, ते चुक आहे.”

धनश्री वर्मा इन्स्टाग्राम पोस्ट

धनश्री पुढे स्पष्ट केलं, “याबद्दल मी काहीच बोलत नाही, म्हणून कोणीही काहीही बोलावं का? माझ्या आई-वडिलांनी मला शिकवलंय की, ज्यांची आपल्याला खरोखर काळजी आहे, त्यांच्यासमोरच स्पष्टीकरण द्यावं. बाकीच्यांवर उगाच वेळ वाया घालवण्याची गरज नाही.”

युजवेंद्र चहल व धनश्री वर्मा यांनी डिसेंबर २०२० मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर काही काळाने या जोडप्यात दुरावा आल्याची चर्चा सुरू झाली. अखेर यावर्षी दोघे विभक्त झाले.